आता पगार कमी असूनही पूर्ण होईल स्वतःच्या घराचे स्वप्न; ICICI होम फायनान्सने सुरू केली नवी सुविधा जाणून घ्या डिटेल्स

शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या स्वतःच्या घरात परिवारासोबत राहण्याचे सुख काही औरच असतं. परंतु शहरात घर खरेदी करणे इतके सोपे नाही

Updated: Aug 15, 2021, 09:16 AM IST
आता पगार कमी असूनही पूर्ण होईल स्वतःच्या घराचे स्वप्न; ICICI होम फायनान्सने सुरू केली नवी सुविधा जाणून घ्या डिटेल्स title=

मुंबई :  शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या स्वतःच्या घरात परिवारासोबत राहण्याचे सुख काही औरच असतं. परंतु शहरात घर खरेदी करणे इतके सोपे नाही. सध्याच्या काळात शहरातील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी घर खरेदी करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अशांना गृह कर्ज काढूनच घर खरेदी करावे लागते. 

गृह कर्ज मिळवणेसुद्धा कमी पगार असलेल्या लोकांसाठी आव्हानच असते. त्यामुळे ICICI होम फायनान्सने कामगार आणि श्रमिकांसाठी गृह कर्ज योजना सुरू केली आहे. याअंतर्गत छोटे कामकार, मजूर तसेच कमी पगार असलेले लोकं सहजपणे कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतील.

तुम्ही घर खरेदीचं स्वप्न पाहत आहात परंतु तुमचा पगार कमी असल्यास ICICI होम फायनान्सची नवीन सुविधा तुमच्या कामी येऊ शकते. बिग फ्रिडम मंथच्या दरम्यान, ऑन द स्पॉट होम लोन मंजूर करण्याच्या सुविधा सुरू कऱण्यात आल्या आहेत. ICICIच्या सर्व शाखांवर लोकांना याबाबतीत गोष्टींची माहिती देण्यात येईल.

लोन घेण्यासाठी कोणते कागदपत्र गरजेचे

कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना ऑन द स्पॉट होम लोनच्या अंतर्ग फायदा पोहचवण्यासाठी योजना सुरू केली आहे. त्यात बढई, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, शिंपी, पेंटर, ऑटो मॅकेनिक, ऑटो-टॅक्सी ड्रायवर इत्यादी व्यक्तींना ऑन द स्पॉट लोन सुविधेअंतर्गत लोन मिळू शकते.