चिमुरडीचे पंतप्रधानांना पत्र ; पप्पा कोमात आहेत मदत करा
ईशूने पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या वडिलांसाठी मदतीची मागणी केली.
Pravin.DabholkarPravin Dabholkar | Updated: Sep 16, 2017, 09:19 PM IST
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील एका चिमुरडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या वडिलांच्या मदतीसाठी एक पत्र लिहिले होते. गेल्या काही वर्षांपासून मुलीचे वडील कोमामध्ये आहेत. पैसे न मिळाल्यामुळे, कुटुंब सुरुवातीच्या उपचारानंतर घरी परतले. एका कच्च्या घरात राहणारी मुलगी तिच्या वडिलांची स्थिती पाहू शकत नव्हती. त्यामुळे अशा प्रकारे तिने पंतप्रधानांकडे मदत मागितली. अलीपुरा गावात राहणाऱ्या या चिमुकलीचे नाव ईशु कुमारी असे आहे.
ईशूने पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या वडिलांसाठी मदतीची मागणी केली. कोणीतरी त्या पत्राची कॉपी ट्विटरवर शेअर केली. या पत्राची दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ईशुच्या वडिलांवर तत्काळ रुग्णालयात उपचार सुरु केले. सहारनपूरच्या गंगोह येथे झालेल्या एका दुर्घटनेत ईशुचे वडील गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविले पण ते त्यांना कोमामध्ये येण्यापासून वाचवू शकले नाही.
ट्विटरवरून माहिती
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार सहारनपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इशूच्या वडीलांना उपचारांसाठी सहारनपूरला आणून त्यांची संपूर्ण व्यवस्था केली. यूपी सीएमओने या कार्यवाहीची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.