सुरक्षा भेदून घेतली राहुल गांधींची भेट, बुके देऊन काढला सेल्फी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. 

Updated: Nov 1, 2017, 09:20 PM IST
सुरक्षा भेदून घेतली राहुल गांधींची भेट, बुके देऊन काढला सेल्फी title=

भरूच : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भरूचमध्ये एका रोड शोदरम्यान एक तरुणी सुरक्षा कवच तोडून राहुल गांधींना भेटण्याचा प्रयत्न करत होती. राहुल गांधींच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या या तरुणीला सुरक्षा रक्षक अडवत होते. राहुल गांधींची नजर या तरुणीवर पडली आणि मग त्यांनी सुरक्षा रक्षकांना मुलीला आतमध्ये सोडण्याची विनंती केली. 

यानंतर मग ही तरुणी राहुल गांधींच्या गाडीवर चढली आणि त्यांना पुष्पगुच्छ दिला. गाडीच्या खालीच उभ्या असलेल्या तिच्या मैत्रिणीकडे मुलीनं मोबाईल मागितला आणि राहुल गांधींबरोबर सेल्फीही काढला. सेल्फी काढून झाल्यावर ती गाडीवरून खाली उतरली आणि निघून गेली. राहुल गांधींची सुरक्षा भेदून त्यांची भेट घेणारी ही तरुणी कोण होती याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.