लॉकडाऊनमध्ये मदत केल्याची सहानुभूती भोवली, nude फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार

राजस्थानातील झालवारमधील ग्रामीण भागात कोरोना काळात एका मुलीच्या वडिलांना उपचारादरम्यान मदत केल्याने मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा घेत त्या व्यक्तीने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Apr 14, 2022, 12:17 PM IST
लॉकडाऊनमध्ये मदत केल्याची सहानुभूती भोवली, nude फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार title=

जयपूर : राजस्थानातील झालवारमधील ग्रामीण भागात कोरोना काळात एका मुलीच्या वडिलांना उपचारादरम्यान मदत केल्याने मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा घेत त्या व्यक्तीने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला. पीडितेने एसपीकडे तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, बीए प्रथम वर्षात शिकणाऱ्या 20 वर्षीय मुलीने पोलिसांना दिलेल्या अहवालात सांगितले की, 2 ते 3 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा अपघातात पाय मोडला होता.

 दरम्यान, कोरोनामुळे कोणतेही साधन उपलब्ध होत नसल्याने आरोपी मुलीच्या वडिलांच्या चहाच्या दुकानात आला आणि म्हणाला की, मी तुझ्या वडिलांचा उपचारासाठी त्यांना माझ्या गाडीत नेतो. आरोपीने मुलीच्या वडिलांना उपचारासाठी झालवारला नेले.
 
 तेव्हापासून त्याला मुलीच्या घरी काहीवेळा जावे लागले. आरोपीने 4 महिन्यांपूर्वी मुलीला आमिष दाखवून आपल्या फार्म हाऊसवर नेले. याठिकाणी आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि फोनवर मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले. त्यानंतर आरोपीने मुलीला त्याच्या कारने घरी सोडले.

 यानंतरही आरोपीने मुलीचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन मुलीवर वारंवार बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर मुलीचे लग्न जुळल्यानंतरही आरोपीने मुलीच्या मंगेतराला धमक्या देणे सुरूच ठेवले.
 
 मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून 70 हजार रुपयेही हडप केले. आरोपी तरुणीवर लग्नासाठीही दबाव टाकत होता. लग्न न केल्यास अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्रास अति होऊ लागल्याने पीडितेने पोलीस तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.