...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!

Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...

Updated: Nov 5, 2022, 12:47 AM IST
...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल! title=
Ghaziabad accident video viral

Accident Viral Video: मध्य प्रदेशातील पिपरिया येथे एका कारचालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोन दुचाकीचालक जखमी झाले. भरधाव असलेली दुचाकी कारला अडकली. चालकाने कार थांबविण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि इथंच गडबड झाली. समोरील कारमध्ये दुचाकी अडकली होती. ती दुचाकी घेऊन तो पळून गेला. त्याचा व्हिडिओही सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होतोय.

नेमकं काय झालं?

पिपरीया येथील रामविलास कॉलनीत राहणारे सिताराम हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते. येथं एक कार आली. अचानक कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये सीताराम आणि त्याचा साथीदार अनुज रस्त्याच्या बाजूला पडले. धडकल्यानंतर लोकांनी कारस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही थांबलाच नाही. 

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, घटनेवेळी सीताराम यांची दुचाकी कारच्या बंपरमध्ये अडकली. कारस्वाराने दुचाकी सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढून नेली. सुमारे अर्ध्या तासानंतर दुचाकी जवळ असलेल्या मंदिरात सापडली. कारचालक वाहनासह पळून गेला होता. कारचालक आणि दुचाकीचालक दोघंही जखमी असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय.