Trending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट

Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण

Updated: Jan 3, 2023, 03:10 PM IST
Trending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट title=

Inretesting Facts about Indian Railway: भारतात पहिले रेल्वे धावलेल्या घटनेला आज जवळपास 165 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 16 एप्रिल 1853 मध्ये  बोरीबंदर ते ठाणे (bori bunder to thane) दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वे (Railway) धावली होती. 34 किलोमीटरचं हे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला एका तासचा अवधी लागला होता. 14 डब्यांच्या या रेल्वेतून जवळपास 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. आज प्रवाशांची (Passengers) संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. देशभरात दररोज लाखो रेल्वेने प्रवास करतात. देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं आहे. जगात सर्वात जास्त रेल्वेचं जाळं असलेल्या देशांत भारताचा समावेश होतो. (Indian Railway)

देशात प्रत्येक नागरिकाने एकदातरी रेल्वेने प्रवास केलेलाच असले. आजही लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला पहिला पसंती दिली जाते. रेल्वे प्रवासादरम्यान अनेक रेल्वे स्टेशन लागतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर त्या त्या रेल्वे स्टेशनचं नाव लिहिलं असतं. प्लॅटफोर्टवर एका मोठ्या पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाच्या अक्षरात त्या स्टेशनचं नाव कोरलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, भारतात पिवळ्या रंगाच्याच बोर्डवर स्टेशनची नावं का असतात? (why do railway station name in yellow colour)

पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच नाव का?
यामागचं कारणही अतिशय मनोरंजक आहे. पिळवा रंग हा अगदी दूरवरुनही चमकतो. प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रंगाचा बोर्ड लोका पायलटला दूरवरुनच दिसतो आणि त्यानुसार तो ट्रेनचा स्पीड कमी करतो. ट्रेन कधी आणि कुठे थांबवयाची आहे याचा अंदाज बोर्डमुळे लोको पायलटला येतो. 

दिवसात पिवळा रंग उन्हात दूरवरुनही चमकतो, तर तर रात्रीही पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाच्या बोर्डचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाची अक्षरं ठळकपणे उठून दिसतात. याशिवाय उन आणि पावसाचही पिवळ्या रंगावर फारसा परिणाम होत नाही. 

हे ही वाचा : याला म्हणतात मराठमोळे संस्कार! रितेश आणि जेनेलियाची ही शिकवण प्रत्येक पालकांसाठी आहे महत्त्वाची

 

ल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेंथ ही सर्वाधिक असते. याच कारणाने शाळेच्या बसेसही पिवळ्या रंगात रंगवल्या जातात. पिवळ्या रंगाची पार्श्व परिधीय दृष्टी लाल रंगापेक्षा 1.24 पट जास्त असते. म्हणजे इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग दुरून अगदी सहज दिसू शकतो. त्यामुळेच भारतात सर्व रेल्व स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवर लिहिली जातात.