मुंबई : जर तुम्ही इंक्रीमेंटची आतुरतेने वाट पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ही बातमी तुम्हाला थोडा विचार करण्यास भाग पाडू शकते. AON कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार एप्रिल महिन्यात होणाऱ्या इंक्रीमेंटमध्ये 20BPS ची कमी होऊ शकते.
गेल्यावर्षी सरासरी 9.3% च्या तुलनेत यंदा जीडीपीमध्ये घट झाली आहे. यंदा 9.1% सरासरी झाली आहे. जीडीपीमध्ये घट झाल्यामुळे यावर परिणाम झाला आहे. कंपनीने 1000हून अधिक लोकांचा डाटा जमा करून त्यावर आधारित हा रिपोर्ट तयार केला.
1000 कंपन्यांमध्ये 500 मॅन्युफॅक्चरिंग, 500 सर्विस सेक्टर कंपन्यांचा समावेश आहे. 40% कंपन्यांनी यंदा इंक्रीमेंट डबल करण्याचा शब्द दिला होता. मात्र GDP मध्ये घसरण झाल्यामुळे कंपन्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणार आहे.
कोरोनाचा परिणाम देखील भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुडीने यंदा जीडीपी ग्रोथला कमी केली आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेची गती अतिशय सुस्त झाली आहे. सोमवारी जीडीपीच्या विकास दरावर कपात केली आहे.
एजन्सीने चालू वित्तवर्ष 2019-20मध्ये विकास दर घटला असून 6.6%वरून 5.4% पर्यंत पोहोचला आहे. पुढील वित्तीय वर्षात 2020021 मध्ये विकास दर अनुमान 6.7%वरून कमी घालं असून 5.8% केला आहे.