याला म्हणतात कर्माचं फळ... 'या' तरुणासोबत घोड्यानं काय केलं, एकदा व्हिडीओ पाहाच

आपल्याला सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याचा समावेश आहे. परंतु हा व्हिडीओ घोड्याचा आहे.

Updated: Aug 7, 2022, 07:55 PM IST
याला म्हणतात कर्माचं फळ... 'या' तरुणासोबत घोड्यानं काय केलं, एकदा व्हिडीओ पाहाच title=

मुंबई : आपल्याला सोशल मीडियावर इतके व्हिडीओ पाहायला मिळतात की इथे आपला वेळ कसा निघून जातो हे आपलंच आपल्याला कळत नाही. तसेच इथे आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. असाच एका घोड्याचा व्हिडीओ जबरदस्त ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ अनेक लोक शेअर आणि लाईक्स करत आहेत.

आपल्याला सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याचा समावेश आहे. परंतु हा व्हिडीओ घोड्याचा आहे.

अनेक लोक घोडा पाळत असले तरी हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, त्यांना हाताळणे खूप कठीण आहे. एवढंच काय तर त्यांच्यावर स्वार होणं देखील अधिक कठीण आहे. घोडा सहजासहजी कोणाच्याही कंट्रोलमध्ये येत नाही आणि जर त्याला राग आला तर..... तर तो काय करतो? 

यासाठी तुम्ही हा व्हिडीओ पाहाच

वास्तविक, या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला घोड्यावर स्वार व्हायचं होतं, परंतु घोड्याला ते आवडलं नाही. ज्यामुळे घोडा त्या व्यक्तीला आपल्यावर स्वार होऊ देत नव्हता. ज्यानंतर या व्यक्तीला राग आला आणि त्याने घोड्याला लाथ मारली. परंतु क्षणाचा विलंब न करता घोड्यानं देखील त्या व्यक्तीला लाथ मारली आणि 'जशास तसे' ही म्हण खरी करुन दाखवली.

हा व्हिडीओ पाहताना इतका मजेदार वाटत आहे की, तो पाहून लोकांना हसू आवरेना. परंतु असं असलं तरी या घोड्याची लाथ इतक्या जोरात त्या व्यक्तीला लागली की, तो व्यक्ती खूपच लांब गेला.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Vicious Videos नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक करून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.