Funny Video: बुलेटची राणी अन् पेट्रोलचा स्वॅग; शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल!

Social Media Viral Video: रिल्स करत असताना बुलेटवरच्या तरुणीसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय.

Updated: Jan 16, 2023, 07:30 PM IST
Funny Video: बुलेटची राणी अन् पेट्रोलचा स्वॅग; शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल! title=
Funny Video

Bullet Girl Viral Video: सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडिओची (Social Media Viral Video) खाण... इंटरनेटवर एखादं गाणं (Viral Song) व्हायरल झालं तर व्हिडिओची रांग लागते. अशातच सध्या ‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्याने (Patli kamariya meri hay hay) धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळतंय. लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांनी देखील या गाण्यावर रिल्स (Reels) बनवायला सुरूवात केली आहे. पतली कमरिया गाण्याने याड लावलं असताना आता एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. (funny video of bullet girl goes viral on patli kamariya meri hay hay song marathi news)

एक तरुणी बुलेटवर (Bullet Girl Viral Video) बसून पतली कमरिया मोरी हाय हाय या गाण्यावर स्वॅग दाखवत होती. रिल्स करत असताना बुलेटवरच्या तरुणीसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्य़ा प्रमाणात शेअर देखील केला जातोय.

आणखी वाचा - VIDEO : प्रियकर थेट लग्नात पोहोचला, नवरीचं पाय धरले; नवरदेवासमोर प्रेमाची भीक मागितली पण...

केसरी आणि काळ्या रंगाचे कपडे, पायात पांढऱ्या रंगाचे बूट, हातात घड्याळ आणि मोकळे सोडलेले केस, असा व्हायरल झालेल्या तरुणीचा आहे. रिल्स करताना तरुणीने बुटेल पायांवर उभी केली. त्यावेळी तिने पेट्रोलचा (Petrol) वास घेतला आणि मागे वळाली. त्यावेळी ती पतली कमरिया गाण्यावर डान्स (Dance Video) करताना दिसते.

पाहा Video - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by funny (@upendrakuma1983)

दरम्यान, डान्स करत असताना तिचा तोल जातो. बुलेटचं वजन जास्त असतं त्यामुळे तरुणीला वजन झेपलं नाही. त्यावेळी तरुणीचा तोल गेला आणि बुलेट खाली पडली. तरुणीने गाडी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी बुलेट ती आवरती व्हयं कोणाला..! तरुणी गाडीसकट खाली पडली आणि शंभर पार केलेलं पेट्रोल देखील सांडलं. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक नेटकरी खळखळून हसत असल्याचं देखील दिसतंय.