पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंह यांच्यासाठी केली प्रार्थना, केंद्रीय आरोग्यमंत्री भेटीसाठी एम्समध्ये

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात (AIIMS) दाखल करण्यात आले आहे.  

Updated: Oct 14, 2021, 12:39 PM IST
पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंह यांच्यासाठी केली प्रार्थना, केंद्रीय आरोग्यमंत्री भेटीसाठी एम्समध्ये  title=

नवी दिल्ली : Manmohan Singh admitted to AIIMS : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. डाॅ. नितीश नायक यांच्या देखरेखाली उपचार करण्यात येत आहेत. (Former Prime Minister Manmohan Singh admitted to AIIMS following fever and weakness) दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनमोहन सिंह यांना ताप आला, त्यानंतर त्यांना एम्स रुग्मालयामध्ये दाखल करण्यात आले आगेय दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

 दरम्यान, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी गुरुवारी एम्स गाठले. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनीही ट्विट करून मनमोहन सिंह यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले, 'मी डॉ. मनमोहन सिंहजी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.'

2004 ते  2014 पर्यंत पंतप्रधान पदावर राहिलेले मनमोहन सिंह यांना यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. ते 19एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना  डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंह यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.