Lalit Modi Successor: 4 हजार 555 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण? रुग्णालयातूनच ललित मोदींची घोषणा

Lalit Modi Successor: ललित मोदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनी रुग्णालयातून ऑक्सिजनचा कृत्रिम पुरवठ्यावाटे श्वास घेत असल्याचं म्हटलं होतं.

Updated: Jan 16, 2023, 09:58 AM IST
Lalit Modi Successor: 4 हजार 555 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण? रुग्णालयातूनच ललित मोदींची घोषणा title=
Lalit Modi Successor

Former IPL Chairman Lalit Modi Names Son His Successor: इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलचे () माजी आयुक्त ललित मोदी (Lalit Modi) यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये त्यांना कोरोनाच्या संसर्गाबरोबरच इन्फ्लूएंझा आणि न्युमोनियाही झाला आहे. रुग्णालयामध्ये उपचार घेत असतानाच ललित मोदींनी त्यांच्या संपत्तीसंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी आजरपणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या उत्ताराधिकाऱ्याचं (Lalit Modi Successor) नाव जाहीर केलं आहे.

मोदींच्या कौटुंबिक के. के. मोदी फॅमिली ट्रस्ट नावाच्या उद्योग समूहात संपत्तीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुलगा रुचिर मोदीला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं आहे. कोरोना संसर्गावर लंडनमधील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचं ललित मोदींनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन सांगितलं होतं. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणाही उपचार घेत असताना सोशल मीडियावरुनच केली आहे. मुलगी आलियाशी चर्चा केल्यानंतरच मुलाला उत्तराधिकारी घोषित केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मी यासंदर्भात मुलीबरोबर चर्चा केली आहे. तिच्या चर्चा केल्यानंतर एलकेएममधील कामकाजाबरोबरच ट्रस्टमधील आमच्या हितसंबंधांसंदर्भातील निर्णय माझा मुलगा रुचिर मोदी घेईल, याबद्दल आमचं एकमत झालं आहे. ललित मोदींचा आई आणि बहिणीबरोबर संपत्तीवरुन वाद सुरु आहे. ललिता मोदींनी आपल्या पोस्टमध्ये या वादाचा उल्लेख 'प्रलंबित आणि कठीण' असा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला यश आलेले नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

मोदींची प्रकृती बिघडल्याने त्यांना मॅक्सिको सिटीमधून लंडनमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना सध्या कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. रुचिर मोदींना उत्ताराधिकारी घोषित केल्यानंतर आता मोदी फॅमिली ट्र्सच्या कुठल्याही संपत्ती तसेच उत्पन्नामध्ये ललित मोदींचा कोणताही हस्तक्षेप नसेल. मात्र केकेएमएफटीचे विश्वस्त म्हणून ललित मोदी कायम राहणार आहेत. मध्यंतरी एका पोस्टमध्ये ललित मोदींनी आपली एकूण संपत्ती 4 हजार 555 कोटी इतकी असल्याचं म्हटलं होतं. आता या सर्व संपत्तीसंदर्भातील व्यवहार रुचिर मोदी पाहणार आहे.