नवी दिल्ली : मनोहर पर्रिकरांची ईमानदार प्रतिमा, कामा प्रति निष्ठा, मेहनत तसेच समर्पणाची भावना, सरळ, साधा दैनंदिन व्यवहार आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता त्यांना भाजपाच्या केंद्रीय राजकारणापर्यंत घेऊन आली. त्यांनी स्वत:च्या हजरजबाबीपणामुळे पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. संरक्षणमंत्री पद ही त्यांनी जबाबदारीने संभाळले. सेनेचे आधुनिकिकरण, वन रॅंक वन पेंशन आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. 2017 ला त्यांनी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनून आपल्या मूळ गावी आले. त्यांच्या निधनानंतर गोव्याच्या राजकारणाला नवे वळण आले आहे. पर्रिकरांच्या आठवणीला देखील उजाळा देण्यात येत आहे. अशात पर्रिकरांनी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केलेली इच्छा अपूर्णच राहीली आहे. ही एक आठवण देखील आता सांगितली जात आहे.
एका वृत्तवाहीनीला मनोहर पर्रिकरांनी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी मी शेवटची 10 वर्षे स्वत: साठी जगू इच्छितो असे म्हटले होते. मी राज्याला खूप काही पुन्हा दिले आहे. मी या कार्यकाळानंतर पुन्हा निवडणूकीचा हिस्सा बनणार नाही. पक्षाने कितीही दबाव आणला तरीही मी निर्णयावर ठाम राहीन असे ते म्हणाले होते. पण पर्रिकरांची ही इच्छा अपूर्णच राहीली.
मापुसा येथे गौर सारस्वत ब्राम्हण परिवारात जन्मलेले पर्रिकर सुरूवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. 1980 दशकात जेव्हा भाजपा गोव्या संदर्भात गंभीरपणे विचार करु लागली होती तेव्हा त्यांनी संघाकडे काही स्वयंसेवक मागितले. संघाने पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपामध्ये पाठवले. 1961 मध्ये पोर्तुगालांपासून मुक्ती मिळाल्यानंतर गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतर पार्टी (एमजीपी) चे शासन होते. त्यांच्याकडे मागास वर्गाचा मोठा जनाधार होता. 1989 मधल्या निवडणुकीत भाजपाला एक टक्क्याहून कमी मते मिळाली. पण राजकीय समज आणि संघटन कौशल्यामुळे एक दशकात पर्रिकरांनी पार्टीला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.