नवी दिल्ली : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (१७ मार्च) निधन झालं. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जनतेचा नेता गेला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांन देत आहेत. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यापासूनच त्यांना कर्करोगाचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. देशभरातील जनता पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा देत आहे. पर्रिकरांनी आपल्या संरक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पण यातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल खूप कमी जणांना माहित आहे.
त्यांनी आपल्या कार्यकाळात रशियाहून हत्यारे खरेदी करताना काही अशी पाऊले उचलली ज्यामुळे देशाचे 49 हजार 300 कोटी रुपये वाचले. रशियाने एस 400 च्या खरेदीसाठी माजी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार एस 400 च्या अध्ययन अहवालातून काही गोष्टी समोर आल्या. एस 400 ची कमी अंतर, मध्यम अंतर आणि दूरच्या अंतराच्या मिसाइल खरेदी केल्या जाणार होत्या. पण पर्रिकारांच्या आदेशानंतर दुसऱ्या देशातील एअर डिफेंस सिस्टिमची समिक्षा देखील करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या देशाच्या मिसाईल कमी खर्चात जास्त येऊ शकतात हे निष्पन्न झाले.
एअर डिफेंस स्टॅटर्जी 3 स्तरांची असते. 25 किमीच्या अंतरावरून गंभीर उपकरणांच्या सुरक्षेसाठी कमी अंतराची यंत्रणा, 40 किमी पर्यंत मध्यम दूरीची यंत्रण आणि याआधी जास्त अंतराच्या धोक्यातून वाचण्यासाठी दूरुन यंत्रणेचा वापर केला जातो. दूरच्या अंतरावरून यंत्र खरेदीनंतर कमी आणि मध्यम अंतराच्या हत्यारांची गरज राहणार नाही. त्यामुळे कमी आणि मध्यम अंतराच्या केवळ 100-100 यंत्रणाच खरेदी कराव्यात अशा सुचना पर्रिकरांनी दिल्या होत्या.
एस 400 ची पाच यंत्र सध्या 6.1 अरब डॉलर (साधारण 427 अब्ज) असण्याची शक्यत आहे. भारताने आतापर्यंत इतके महाग एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी केले नाही. प्रति वर्गफुट कवरेज एरिया प्रमाणे पाहायला गेल्यास हे जगातील कोणत्याही एअर डिफेंस सिस्टिमच्या तुलनेत स्वस्तच आहे.