उत्तर भारत धुक्यात हरवला!

गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. 

Updated: Jan 5, 2018, 09:13 AM IST
उत्तर भारत धुक्यात हरवला! title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. 

मात्र, बुधवारी मात्र सगळ्यात जास्त दाट धुकं पाहायला मिळालं. बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पाकिस्तानपासून ईशान्य भारतापर्यंत धुक्याची दाट चादर पसरली होती. भारतीय उपखंडातील जवळपास दोन हजार किलोमीटर पर्यंतच्या मैदानी प्रदेशावर हे दाट धुकं पसरलं होतं. 

भारतीय राष्ट्रीय उपग्रहाद्वारे प्रसारित थ्रीडी फोटोमध्ये पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत ही धुक्याची दाट चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. 

दाट धुक्याची सुरुवात २५ डिसेंबरपासून उत्तर प्रदेश आणि बिहारपासून झाली. त्यानंतर दिवसागणिक हे धुकं पश्चिमेच्या दिशेने सरकत २ जानेवारीला पंजाब आणि मग पुढे पाकिस्तानपर्यंत पोहचलं. या धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक ठप्प झाली होती.