Britannia Dividend 2023: गुंतवणूकदरांसाठी कमाईची संधी; 3 वर्षानंतर 'ब्रिटानिया'कडून 7200% Dividend ची घोषणा

Britannia Dividend 2023: सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमधील (Share Market Today) उसळी पाहायला मिळते आहे. त्यातून आता एफएमसीजीच्या क्षेत्रातही गुंतवणूकदारांना चांगला फायदा पाहायला मिळेल. 'ब्रिटानिया' (Britannia Share Price) या कंपनीनं वर्षभरानंतर चांगला घसघशीत डिव्हिडंट दिला आहे. यातून तुम्हाला प्रति शेअर 72 रूपयांचा अंतरिम डिव्हिडंट (Interim Dividend) मिळणार आहे. 

Updated: Apr 5, 2023, 12:19 PM IST
Britannia Dividend 2023: गुंतवणूकदरांसाठी कमाईची संधी; 3 वर्षानंतर 'ब्रिटानिया'कडून 7200% Dividend ची घोषणा title=
Fmcg company britannia announces highest dividend payout of rupees 72 per share business trending news in marathi

Britannia Dividend 2023: कालच्या सुट्टीनंतर सध्या शेअर मार्केटमध्ये (Share Market Opening) चांगली सुरूवात झालेली पाहायला मिळते आहे. सोबत 'ब्रिटानिया' (Brithannia Share Price) या कंपनीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक आनंदीची (Good News for Investors) बातमी दिली आहे. ब्रिटानियानं मंगळवारी 7200% अंतरिम डिव्हिडंटची (Interim Dividend) घोषणा केली आहे. याचाच अर्थ शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 72 रूपये इतका डिव्हिडंट मिळेल. जून 2022 नंतर 'ब्रिटानिया'नं आपला एक नवा डिव्हिडंट जाहीर केला आहे.

ही कंपनी 1 रूपयांच्या फेस व्ह्यूलवर 72 रूपये प्रति शेअरचा डिव्हिडंट देणार आहे. जून 2022 साली आलेल्या या कंपनीच्या डेव्हिडंटची घोषणा केली तेव्हा डेव्हिडंट हा 56 रूपये प्रति शेअर इतका होता. (Fmcg company britannia announces highest dividend payout of rupees 72 per share business trending news in marathi)

13 एप्रिलपर्यंत या डिव्हिडंटची रेकॉर्ड डेट फिक्स आहे. हा डेव्हिडंट तीन वर्षांनंतर सर्वाधिक डेव्हिडंट ठरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी यंदा ब्रिटानिया या कंपनीनं कमाईची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या काळात डेव्हिडंटमधूनही चांगली कमाई करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये स्टॉक, शेअर आणि इक्विटीप्रमाणे तुम्ही डेव्हिडंटमधूनही चांगली कमाई करू शकता. तेव्हा मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरूवातीला म्हणजेच येत्या नव्या आर्थिक वर्षांच्या सुरूवातीला तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्ही योग्य ती स्ट्रॅटजी वापरू शकता. 

3 वर्षांनंतर सर्वाधिक डेव्हिडंट (Highest Dividend) : 

2022-23 या वित्तीय वर्षासाठी ब्रिटानियानं 72 रूपये प्रति शेअरची घोषणा केली असून यापुर्वी 2022 साली मे-जूनमध्ये 56.50 रूपयांचा डेव्हिडंट शेअरहोल्डर्सना दिला होता. त्यापुर्वी याच कंपनीकडून मे 2021 मध्ये 62 प्रति शेअरचा डेव्हिडंट जाहीर केला होता. तर लॉकडाऊनमध्ये म्हणजे ऑगस्ट 2020 या कंपनीनं शेयरहॉल्डर्सना (Shareholders) 83 रूपये प्रति शेअरचा डेव्हिडंट दिला होता. त्यामुळे 2020 मध्ये 83 रूपये, 2021 मध्ये 62 रूपये तर 2022 मध्ये 56 रूपयांनंतर ब्रिटानियानं सलग चौथ्या वर्षी कंपनीतर्फे डेव्हिडंटची घोषणा केली आहे. 2020 च्या 83 रूपयांच्या डेव्हिडंटनंतर ब्रिटानियानं 2023 मध्ये सर्वाधिक म्हणजेच हाययेस्ट डेव्हिडंटची घोषणा केली आहे. 

कशी वापराल स्ट्रॅटेजी? 

इतका मोठा डेव्हिडंट जाहीर झाल्यानंतर आता हा शेअर विकावा का खरेदी करावा असा प्रश्न आपल्यापैंकी अनेकांना पडला असेलच. त्याचबरोबर आपल्याला ब्रोकरेज (Brokerage) एक्सपर्ट्सकडून या स्टॉकबद्दल जाणून घेणे योग्य ठरेल. या कंपनीचा शेअरही 4324 रूपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही योग्य ती स्ट्रेटजी वापरून तुम्ही योग्य ती खरेदी विक्री करू शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. गुंतवणूक करण्यापुर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)