Fish Seller Wins 75 lakh in Lottery: देने वाला जब भी देता, हे अभिनेता अक्षय कुमारचं (Akshay Kumar) गाणं आठवतं का तुम्हाला...हेरा फेरी (Hera Pheri) या चित्रपटातील अभिनेते अक्षय कुमार, परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या जीवनात अचानक पैसा येतो तेव्हा काय होतं हे दाखविण्यात आले आहे. असाच एक किस्सा रीयल लाइफ एका मासे विक्रेत्यासोबत झाला आहे. त्याची ही रीयल लाइफ स्टोरी सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.
पुकुंजू (Pukunju) या मासे विक्रेत्याने (Fish Seller) आठ वर्षांपूर्वी कॉर्पोरेशन बँकेकडून 7.45(Corporation Bank) लाखांचं कर्ज घेतलं होतं. तेव्हापासून कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आता त्याला व्याजासह सुमारे 12 लाख रुपयांचे कर्ज (loan) फरतफेड करायचं होतं. 12 ऑक्टोबरला अचानक सकाळी त्याला बँकेकडून संलग्नक नोटीस मिळाली. आता आपलं घर जाणार या भीतीने तो काळजीत पडला होता. पण म्हणतात ना, भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है...असं काहीसा प्रकार त्याचासोबत झाला. (Fish Seller Wins 75 lakh in Lottery after getting attachment notice from bank nmp )
चिंतेत असताना पुढच्या काही क्षणांमध्ये त्याचं आयुष्य बदलेले असा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. पण त्याला सकाळी नोटीस मिळाली आणि तासाभरात त्याला बंपर लॉटरी लागली. अक्षया लॉटरीचे (Lottery)सर्वोच्च पारितोषिक जिंकण्यासाठी तो भाग्यवान ठरला. थोडे थोडे के नाही तर त्याला 70 लाखांची लॉटरी लागली होती आणि त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.
केरळमधील (Kerala) कोल्लम (Kollam) जिल्ह्यातील मैनागपल्लीमध्ये हा चमत्कार घडला आहे. पुकुंजू, हे 12 ऑक्टोबर हा दिवस कधीही विसरता येणार नाही, असं सांगतात. पुकुंजू हा 40 वर्षीय मासेविक्रेता कर्जबाजारी होता. पण नशिबाने असा खेळ दाखवला की काही तासातच त्याचं सगळं संकट संपलं आणि तो श्रीमंतही झाला. पुकुंजू यांचे वडील युसूफ कुंजू अनेकदा लॉटरी खरेदी करायचे. पण पुकुंजू क्वचितच लॉटरीची तिकिटे खरेदी करायचा. मंगळवारी त्यांनी प्लामुतिल बाजारमधील लॉटरी विक्रेत्या गोपाल पिल्लई यांच्याकडून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तिकीट क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर, तो आपल्या पत्नी आणि मुलांकडे आनंदाची बातमी सांगण्यासाठी धावला...