Optical Illusion : वेळ 5 मिनिट, खोलीमधील इअरफोन शोधा, जिनिअस लोकं 2 मिनिटांमध्ये सांगतील!

99 टक्के लोक उत्तर देण्यास अपयशी ठरली आहेत, तुम्ही किती वेळात शोधलं?  

Updated: Oct 14, 2022, 05:05 PM IST
 Optical Illusion : वेळ 5 मिनिट, खोलीमधील इअरफोन शोधा, जिनिअस लोकं 2 मिनिटांमध्ये सांगतील! title=

Optical Illusion : सोशल मीडियावर (Social Media) अनेक ऑप्टिकल इल्यूजन्स (Optical Illusion) व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजन्सच्या चित्रांमध्ये काहीतरी लपलेले आहे जे शोधण्यासाठी लोकांना खुप डोक लावाव लागत. अनेक लोक आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि कुशाग्र बुद्धीने या चित्रांमधील दडलेले रहस्य सहजपणे सोडवतात, तर अनेकांना घाम फुटतो.

असाच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका खोलीतील सर्व वस्तूंमध्ये वायर्ड इअरफोन देखील ठेवलेला आहे आणि तो कुठे आहे तो शोधायचा आहे. 

या चित्रात एक खोली दिसत आहे आणि त्यात बरेच सामान दिसत आहे. या वस्तूंच्या मध्ये इअरफोनही आहे. तुम्हाला तो शोधायचा आहे असून तो कुठे आहे ते सांगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डोक्याला थोडा ताण द्यावा लागणार आहे. अनेकांना या ऑप्टिकलचे (Optical Illusion) उत्तर सहज देता आलं, तर अनेकांनी याला अतिशय अवघड म्हटले. ज्यांना हे ऑप्टिकल सोडवण्यात अपयश आलं असावं.

इअरफोन डाव्या बाजूला ठेवलेल्या रॅकवर ठेवला आहे. तो पांढऱ्या रंगाचा आहे. नीट पाहिल्यावर असे दिसून येते की जिथे बॉक्स ठेवला आहे, त्या बॉक्सच्या वरच्या बाजूला अगदी शेवटच्या बाजूला इअरफोन ठेवलेला आहे.