नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीचा पहिला दृष्य दुष्परिणाम समोर आलाय. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी तीन वर्षांतल्या निच्चांकावर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. २०१६-1१७ या आर्थिक वर्षात देशाचा GDP ७.१ टक्क्यांपर्यंत खाली आलाय.
त्या आधीच्या दोन वर्षांत तो अनुक्रमे ८ टक्के आणि ७.५ टक्क्यांवर होता. या वर्षात उत्पादन आणि सेवाक्षेत्रामधलं उत्पन्न घटल्यामुळे GDP खाली आल्याचं स्पष्ट झालंय. या काळात कृषीक्षेत्राची वाढ मात्र चांगली झालीये.