Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?

Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

Updated: Feb 1, 2023, 04:22 PM IST
Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले? title=

Nirmala Sitaraman: आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता. 1 फेब्रुवारी 2023 ला अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Niramala Sitaraman) यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या बजेटकडून व्यापारी, नोकरदारवर्ग, महिला आणि तरूण पिढीचे बारीक लक्ष्य होते. या बजेटनंतर सगळ्यांच्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया (Reactions on Budget) येत आहेत. 2024 मध्ये केंद्रीय निवडणूका असल्या कारणानं आता या बजेटमध्येही लोकांना खुश करण्यासाठी विविध योजना आणण्याचे प्रयत्न केले जातील असे तज्ञांचे (Experts on Budget) मतं होते. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. काहींना हे बजेट सकारात्मक वाटले तर काहींना हे बजेट पुर्णत: निराशाजनक वाटले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणाकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. त्यातून त्यांनी कोणत्या शब्दांचा वारंवार उल्लेख केला हे जाणून घेणे तितकेच रंजक आहे. (Finance Minister Nirmala Sitaraman used income tax word 14 times and  custom duty 15 times in her live speech today on budget)

येत्या बजेटमधून केंद्र सरकारनं महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि नोकरदारवर्गाला अनेक नव्या योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारनं यावेळेस लोकाभिमुख बजेटमधून विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नोकरदारवर्गावर जास्त भर दिला आहे. त्यातून या बजेटमध्ये 7 लाखांवरील उत्पन्नावर (Tax Free Income) कर सूट दिली आहे. अशा विविध गोष्टी बजेटमधून अर्थमंत्र्यांनी काढल्या असल्या तरी त्यांच्या तोडांतून या भाषणामध्ये दोन शब्द वारंवार उच्चारले गेले. एक शब्द 58 वेळा तर दुसरा शब्द 81 वेळा त्यांच्या कडून उच्चारला गेला. 

इनकम टॅक्स (Income Tax) हा शब्द अनेकदा लोकांकडूनही सर्च केला जातो. दर वर्षी येणाऱ्या बजेटमध्ये कोणत्या गोष्टी किती महागल्या आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत याकडे सगळ्यांचेच लक्ष असते त्यातून आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्याला किती टक्के टॅक्स भरावा लागणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे यावेळी अर्थमंत्र्यांनीही टॅक्स या शब्दाचाही 81 वेळा वापर केला आहे आणि इनकम या शब्दाचा 58 वेळा वापर केला आहे. 

फक्त इनकम टॅक्सचं नाही तर इतर काही शब्दांचाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून वारंवार उल्लेख करण्यात आला आकाडा ऐकला तर तुम्हालाही आश्चर्य वाटले. त्यांच्या भाषणामध्ये प्रस्ताव (Proposed) हा शब्द वारंवार वापरला गेला. प्रस्ताव हा शब्द त्यांनी 89 वा उच्चारला. पर्सेंट (Percent) हा शब्द 79 वेळा तर लाख करोड (Lakh Crore) हा शब्द 19 वेळा उच्चारला गेला. अर्थातच प्रत्येक बजेटमध्ये विशिष्ट रक्कमेची तरतूद केलेली असते. त्यामुळे हा शब्द उच्चारला अनेक वेळा जातोच जातो. 14 वेळा इनकम टॅक्स (Income Tax) हा पुर्ण शब्द वापरला गेला तर 15 वेळा कस्टम ड्यूटी (Custom Duty) हा शब्द वापरला गेला.