Viral News: शेतकरी नही फायर है मै....; भोरमधील बळीराजाचा प्रयोग पाहून चकीत व्हाल!

भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील गरुड वस्ती, खानापूर गावच्या स्वप्निल सिताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलविली आहे.

Updated: Nov 1, 2022, 03:39 PM IST
Viral News: शेतकरी नही फायर है मै....; भोरमधील बळीराजाचा प्रयोग पाहून चकीत व्हाल! title=

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर: शेतकरी आता बदलत्या युगाप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करताना दिसत आहेत. अशीच एक घटना पुण्याच्या भोर तालुक्यात घडली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखांचे उत्पन्न तयार होण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या भोरमधील खानापूर गावच्या स्वप्निल मरगजे (Swapnil Margaje) या शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर 3 आर एवढ्या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्टाॅबेरीची यशस्वी शेती केली आहे. व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming), टेबल टाॅप फार्मिंग, बेड फार्मिंग, ग्रो बॅग फार्मिंग असे आधुनिक प्रयोग करत त्यांनी ही शेती केली आहे. परिसरातले शेतकरी ही आधुनिक शेती पाहण्यासाठी आणि या शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. (farmer swapnil sitaram margaje from bhor pune farms strawberry with modern technology vertical farming)

भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील गरुड वस्ती, खानापूर गावच्या स्वप्निल सिताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलविली आहे. 3 आर एवढ्या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अमोल अंबुले व प्रकाश गोळे यांचे मार्गदर्शन घेत ही शेती केली आहे. 

मदरप्लांटपासून (Mother Plant) घरी तयार केलेली 2800 रोपे महिन्याची झाल्यावर त्यांची लागवड करण्यात आली आहे. लागवड करताना ग्रो बॅग मध्ये बॅग भरताना 50% माती, 30% कोकोपीट, 20% कंपोस्टखताचा वापर करण्यात आलाय. या शेतीला बोअरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रोपांना पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आलं आहे. 

लालबुंद स्ट्रॉबेरी रोप लागल्यानं आजपर्यंत 70000 रुपये खर्च करून दोन टन स्टाॅबेरीचा उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. 150 रुपये किलोने तीन लाखांचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. यासाठी घरातील सदस्य आई, वडील, पत्नी, मुले यांच्या सहकार्याने स्टाॅबेरीची शेती यशस्वी झाली असल्याचं शेतकऱ्यानी म्हटलंय.  

आत्तापर्यंत ही शेती कशी विकसित केली याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल माहिती घेण्याचाही प्रयत्न केला आहे. या नव्या आधुनिक शेतीचा फायदा अनेक शेतकऱ्यांना करता येणार आहे. स्ट्रोबरीच्या या आधुनिक शेतीमुळे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते.