'फोटोशूटपूर्वीची तयारी'; जखमींना भेटायला येणाऱ्या पंतप्रधानांसाठी रुग्णालयात रंगरंगोटी?

 पंतप्रधानांचे चांगले फोटो यावेत यासाठी सर्व व्यवस्था?

Updated: Nov 1, 2022, 08:33 AM IST
'फोटोशूटपूर्वीची तयारी'; जखमींना भेटायला येणाऱ्या पंतप्रधानांसाठी रुग्णालयात रंगरंगोटी? title=
(फोटो सौजन्य - @INCIndia)

गुजरातमधील (Gujarat) मोरबी (Morbi) येथे केबल-स्टेंड पूल कोसळल्याने (bridge collapse) मृतांची संख्या 132 च्या वर पोहोचली आहे. अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर जगभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही या घटनेवरुन दुःख व्यक्त करत मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत बचावलेल्या जखमींना मोरबी (Morbi) येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (morbi civil hospital) दाखल करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत. मात्र या अपघातानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. (Painting at Gujarat Morbi Hospital before PM Modi visit congress aap criticize bjp)

पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणाऱ्या रुग्णालयात  रंगकाम सुरु असल्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध करून विरोधकांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने (Congress) याला शोकांतिका म्हटले आहे, तर आम आदमी पक्षाने (AAP) ही भाजपच्या (BJP) फोटोशूटपूर्वीची (Photoshoot) तयारी असल्याचे म्हटले आहे.
 
गुजरातमधील मोरबी (Morbi) येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होण्यापूर्वी रात्री उशिरा रंगरंगोटीचे (Painting) काम करण्यात आले. ऐतिहासिक पूल कोसळून जखमी झालेल्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सिव्हिल हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे कथित फोटो शेअर केले आहेत आणि दावा केला आहे की पंतप्रधानांचे चांगले फोटो यावेत यासाठी ही सर्व व्यवस्था केली जात आहेत. मात्र, झी 24 तास हे फोटो खरे असल्याचा दावा करत नाही.

Morbi Bridge accident : पुलावर सुरु होता मृत्यूचा खेळ; अपघातापूर्वीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

काँग्रेस ट्विट करत, "दुःखद घटना. उद्या पंतप्रधान मोदी मोरबी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देतील. त्याआधी रंगरंगोटीचे काम सुरू आहे. चकचकीत फरशा बसवल्या जात आहेत. पंतप्रधानांच्या फोटोशूटमध्ये कोणतीही कमतरता होऊ नये, त्यासाठी सर्व व्यवस्था केली जात आहे. त्यांना लाज वाटत नाही! इतके लोक मेले आणि ते कार्यक्रम करण्यात मग्न आहेत," असे म्हटलं आहे.

दुसरीकडे, आपनेही (AAP) ट्विट केले आहे. "मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रात्रभर रंगरंगोटी केली जात आहे जेणेकरून उद्या पंतप्रधान मोदींच्या फोटोशूटमध्ये खराब इमारतीचा पर्दाफाश होऊ नये. 141 लोक मरण पावले, शेकडो बेपत्ता आहेत, खर्‍या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र भाजपवाल्यांना फोटोशूट करून झाकून टाकायचे आहे," असे आपने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> गुजरातचा अपघात 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे' की.... पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत विरोधकांचा खडा सवाल

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मोरबी शहरात ब्रिटीशकालीन झुलता पूल कोसळून किमान 132 जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की तांत्रिक आणि संरचनात्मक त्रुटी आणि देखभालीची समस्या या दुर्घटनेसाठी प्रथमदर्शनी जबाबदार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रात्री उशिरा मोरबी पूल कोसळण्याच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले. पंतप्रधानांना अपघातस्थळी करण्यात आलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती देण्यात आली आणि या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली.