Viral Video : तुम्ही कधी हातपंपातून पाण्यासोबत आग आल्याचं पाहिलंय का. असं एक गाव आहे तिथे हातपंपातून पाण्यासोबत आग येते. आग बाहेर येत असल्याने गावात चमत्कार झाल्याची अफवा पसरलीय. नक्की कुठे घडलाय हा प्रकार? पाण्यासोबत आग येतेच कशी? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहूयात. (fact check viral polkhol madhya pradesh hand pump fire know what true what false)
हातपंपातून पाण्यासोबत अचानक आग निघाली आणि गावात एकच खळबळ उडाली. गावात चमत्कार झाला अशी अफवा वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि अख्खं गाव पाण्यासोबत बाहेर येत असलेली आग बघण्यासाठी एकवटलं.
गाड्या भरून भरून ही आग पाहण्यासाठी लोक येऊ लागले. पण, गावातील लोक मात्र, दहशतीत होते. पाण्यातून आग येऊ लागल्याने प्यायच्या पाण्याचं काय हा प्रश्न गावकऱ्यांना होता. हा आगीचा व्हिडिओ नक्की आहे तरी कुठला? याची आम्ही पडताळणी केली. हा व्हीडिओ मध्य प्रदेशातील असल्याचं समोर आलं. नक्की काय घडलं या गावात चला पाहुयात.
मध्य प्रदेशच्या छतरपूरच्या कछार गावात हा प्रकार घडला. हातपंपातून पाण्यासोबत आगीचे लोळ बाहेर आले. जमिनीतील केमिकलमुळे आगीचे लोळ येत असल्याची शक्यता आहे. पाण्यासोबत आग आल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई.
हा व्हीडिओ आता व्हायरल होत असून, लोक दहशतीत आहेत. छतरपूर गावात चमत्कार झाल्याची अफवा पसरलीय...पण, हा चमत्कार नसून, पाण्यातल्या केमिकलमुळे आग लागल्याचं बोललं जातंय. याचा तपास सुरू असून, खरं काय आणि खोटं काय ते तपासाअंतीच समोर येईल.