Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट?

दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे.

Updated: Jun 9, 2022, 11:47 PM IST
Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट? title=

योगेश खरे झी 24 तास नाशिक : बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. दहा हजाराची नोट बाजारात आल्याचा दावा करण्यात आलाय. 10 हजाराची नोट बाजारात आल्याच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलंय. पण, खरंच 10 हजारांची नोट आलीय का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol 10 thousand note know what truth what false)

दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे. पण, खरंच आता 10 हजाराची नोट बाजारात आलीय का? एवढ्या मोठ्या चलनाची नोट बाजारात आली मग कुणालाच माहिती कशी नाही? 

याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही याची व्हायरल पोलखोल केली. आमचे प्रतिनिधी नोटांचं प्रदर्शन लावलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे असलेल्या एक्सपर्टना याबाबत विचारणा केली. त्यावेळी काय सांगितलं पाहुयात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.

व्हायरल पोलखोल

नाशिकमध्ये इंग्रजांनी 1924 साली सर्वप्रथम नोटांचा कारखाना सुरू केला. भारतात दोन हजारप्रमाणे दहा हजारांची नोट छापण्यात आली. आता 10 हजारांची नोट चलनात आलेली नाही. जुन्या नोटांचं प्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं.  भारतात दहा हजाराची नोट छापण्यात आली होती. पण, भारतात बाजारात दहा हजांराची नोट आल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला.