Viral Polkhol : ज्यांनी कोरोनाचे दोन (Corona Vaccination) डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असा एक मेसेज व्हायरल (Viral Messege) होतोय. पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय. पण हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा. (fact check government will give 5 thousand rupees to people who both doses of corona have been take)
दावा आहे की, तुम्ही कोरोनाचे दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला केंद्र सरकार ५ हजार रुपये देणार. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत. त्यामुळे प्रत्येकालाच या दाव्याबाबत माहिती हवीय. पैसे कसे मिळणार? त्यासाठी काय करायला हवं हे सगळं मेसेजमध्ये सांगण्यात आलंय.व्हायरल मेसेजसोबत फॉर्मची लिंकही पाठवण्यात आलीय. पण हे खरं आहे का? केंद्र सरकार पैसे देणार आहे का? याची आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
आम्ही याबाबत सरकारच्या संबंधित डिपोर्टमेंटशी बोलून माहिती विचारली. पण अशी कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी सांगितलं. मग हा मेसेज कुणी पाठवलाय याचा शोध घेतला. त्यावेळी याचं सत्य समोर आलं. केंद्राच्या पीआयबीय ट्विटर वरूनच हा मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.
कोरोनाचे 2 डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. मेसेजसोबत पाठवलेल्या लिंकवर माहिती देऊ नका. तुमची वैयक्तिक माहिती चोरीचा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्हाला अशी लिंक आली असल्यास डिटेल्स भरू नका. पैसे मिळण्याऐवजी तुमच्याच खात्यातील पैसे जाऊ शकतात. आमच्या पडताळणीत दोन डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा असत्य ठरला.