व्हिस्कीचा रंग गोल्डन का असतो? तुम्ही कधी विचार केलाय?

याला असा रंग का असतो? बरं हा रंग नैसर्गीक असतो की, तो त्यामध्ये मिसळला जातो. याच्याबद्दल देखील तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? 

Updated: Mar 8, 2022, 05:12 PM IST
व्हिस्कीचा रंग गोल्डन का असतो? तुम्ही कधी विचार केलाय? title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक दारु पितात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची दारु आवडते. ज्यामध्ये व्हिस्की, वोडका, बिअर, वाईन सारख्या प्रकारांचा समावेश आहे. या ड्रिंक्सच्या नावाप्रमाणेच त्याची चव आणि त्याचा रंग देखील वेगवेगळा असतो. म्हणजेच जर वोडक्याबद्दल बोलायचं झालं तर, तो क्रिस्टल क्लिअर रंगाचा असतो. पण त्यात व्हिस्कीचा रंग मात्र सोनेरी रंगाचा असतो, परंतु याला असा रंग का असतो? बरं हा रंग नैसर्गीक असतो की, तो त्यामध्ये मिसळला जातो. याच्याबद्दल देखील तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? तर आज आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टींबाबत माहिती देणार आहोत. 

व्हिस्कीच्या सोनेरी रंगाचे मुख्य कारण आहे लाकडी बॅरल, म्हणजेच लाकडी ड्रम. जेव्हाही व्हिस्की बनवली जाते तेव्हा ती प्रथम क्रिस्टल रंगाची म्हणजेच पाण्यासारखी बनते. परंतु तिला अनेक काळासाठी लाकडी बॅरलमध्ये ठेवले जाते, त्यामुळे तिचा रंग बदलतो. त्यामुळे तिचा रंग हलका पिवळा होऊ लागतो. ज्यामुळे व्हिस्किला नैसर्गिक रंग आणि चव येते.

ज्या बॅरलमध्ये व्हिस्की ठेवली जाते, त्या बॅरलला हलकं रोस्ट म्हणजेच भाजलं जातं, ज्यामुळे ते हलकं मऊ होतं. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्यप्रकाश त्यावर पडतो तेव्हा दारू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. परंतु ती लाकडाच्या आत जाते.

परंतु नंतर ती रात्रीच्या वेळी त्यातून बाहेर येते, ज्यामुळे त्याला या लाकडापासून एक विशिष्ट रंग मिळतो. अशा स्थितीत, व्हिस्कीचा रंग अधिक सोनेरी होऊ लागतो.

तर कधीधी कधी यात कलरसाठी कारमेल रंगाचा वापर केला जातो, त्यामध्ये यासाठी कलर वापरतात, ज्यामुळे दारुला एक सारख रंग येईल.