'डेटा लिक' वादाचा फेसबुकवर अनपेक्षित परिणाम

डेटा लिक वादानंतरही फेसबुक वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ 

Updated: Jan 31, 2019, 02:12 PM IST
'डेटा लिक' वादाचा फेसबुकवर अनपेक्षित परिणाम title=

मुंबई : डेटा लिक प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सोशल मीडिया वेबसाईट 'फेसबुक'ला मोठा फायदा झाला आहे. डेटा लिक प्रकरणी झालेल्या वादानंतरही फेसबुकच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वापरकर्त्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे फेसबुकला डिसेंबरच्या तिमाहीत मोठा नफा झाला आहे. डिसेंबर तिमाहीमधील नफा ६१ टक्के वाढून तो ६.९ अरब डॉलरवर पोहचला आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या वार्षिक महसुलाच्या आधारावर नफ्यात ३० टक्क्यांची वाढ होऊन तो १६.९० अरब डॉलरवर पोहचला आहे. याच दरम्यान वापरकर्त्यांच्या संख्येतही ९ टक्क्यांची वाढ होत ती २.३२ अरबवर पोहचली आहे. 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी व्यवसायात वाढ होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. कंपनीच्या नफ्यात झालेल्या वाढीनंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये ७.७० टक्के वाढ झाली असून तो १६१.९९ डॉलरवर पोहचला आहे. वर्षातील चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही ४४ टक्के वाढ झाली असून फेसबुक कर्मचाऱ्यांची संख्या ३५,५८७ वर पोहचली आहे. 

प्रत्येक महिन्याला जवळपास २.७ अब्ज लोक फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप किंवा मेसेंजरचा वापर करतात. २ अब्जहून अधिक लोक या अॅपपैकी किमान एक अॅपचा वापर करतात. कॅनडा आणि यूएसमध्ये जवळपास १ अब्ज लोक या अॅप्सचा वापर करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.