Extra Marital Affair : सासऱ्याने तिला प्रियकरासोबत 'त्या' अवस्थेत पाहिले, अन् झाला मुलाच्या हत्येचा उलगडा

Extra Marital Affair : प्रियकरासोबत अनैंतिक संबंध ठेवत होती, सासऱ्याने पकडलं रंगेहाथ, आणि तब्बल 6 महिन्यानंतर झाला मुलाच्या हत्येचा उलगडा

Updated: Nov 21, 2022, 10:01 PM IST
Extra Marital Affair : सासऱ्याने तिला प्रियकरासोबत 'त्या' अवस्थेत पाहिले, अन् झाला मुलाच्या हत्येचा उलगडा title=

Extra Marital Affair : देशात एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेअरच्या (Extra Marital Affair) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनेंमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. आता या घटनेत अशीच एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअरची घटना समोर आली आहे. या घटनेत सुनेच्या अफेअरमुळे मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. तब्बल 6 महिन्यानंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. 
 
या घटनेत एका महिलेच्या पतीची 6 महिन्यापुर्वीच हत्या झाली होती. या हत्येचा तपास पोलिसांनी केला होता, मात्र त्यांच्या हाती कोणताही सुगावा लागला नव्हता. त्यामुळे तपास असाच रखडला होता. कुटूंब मुलाच्या हत्येच्या आरोपीला अटक व्हावी अशी रोज प्रार्थना करत होती, मात्र तपास काही लागत नव्हता.

सुनेला 'त्या' अवस्थेत पाहिले

गेल्या महिन्यात मृत मुलाचे वडिल हरिप्रसाद शर्मा हे नेहमीप्रमाणे रात्री घरात झोपले होते. यावेळी त्यांना कसला तरी आवाज आला. हा आवाज तपासण्यासाठी ते स्वत: च्या रुममधून बाहेर आले. यावेळी त्यांना हा आवाज सुनेच्या रुममधून येत असल्याचा संशल आला.त्यामुळे त्यांनी सुनेच्या रूम उघडला असता, त्यांनी जे दृष्य पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची सुन तिच्या प्रियकरासोबत (Extra Marital Affair) बेडवर मौज मजा करत होती. त्यांना त्या अवस्थेत पाहून हरिप्रसाद शर्मा यांना मोठा धक्का बसला होता.  

सुनेचे अनैतिक संबंध

पवन शर्माचे 2015 मध्ये कानपूर येथील रहिवासी असलेल्या रीमासोबत लग्न झाले होते आणि नंतर त्यांना दोन मुले झाली. मात्र यादरम्यान रीमा शेजारच्या भोलाच्या प्रेमात पडली होती. हळूहळू दोघांचे प्रेम वाढले आणि अवैध संबंधही (Extra Marital Affair) निर्माण झाले.दरम्यान एका रात्री भोला आणि रीमाचे अवैध संबंध असल्याचे पती पवनला कळाले. त्याने देखील या दोघांना रंगेहाथ पकडले होते. 

अनैतिक संबंधातून हत्या 

दरम्यान पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांनी त्याला मारण्याचा कट रचला. भोला आणि रीमा यांनी मिळून पवनची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकून दिला. या घटनेची कोणालाच माहिती नव्हती. साधारण पोलिस 4-5 महिने या घटनेचा तपास करत होते. मात्र त्यांना या घटनेत एकही धागा दोरा सापडला नव्हता. 

असा झाला हत्येचा उलगडा 

मुलाचे वडिल म्हणजे सासऱ्याने सुनेला प्रियकराला त्या अवस्थेत पाहताच,त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच सुनेवर मुलाच्या हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी कडक कारवाई केल्यावर आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तसेच तिने प्रियकरासह (Extra Marital Affair) पतीची हत्या करून रात्री मृतदेह कालव्यात फेकल्याची कबूली दिली. आरोपींनी मृतदेह ज्या कालव्यात फेकला होता, त्या कालव्यातून मृत पवनची पँट आणि आधारकार्ड आणि हाडे सापडली आहेत.सध्या पोलिसांनी रीमा आणि भोला या दोघांना अटक केली आहे. 

राजस्थानमध्येही घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.