Fact Check: असा दावा आहे की, गरम नारळाचं पाणी (hot coconut water) प्यायल्याने कॅन्सरसारखा (cancer) भयंकर आजार बरा होऊ शकतो. रोज हे गरम नारळाचं पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी (cancer cells) नष्ट होतात आणि कॅन्सर होत नाही, असा दावा करण्यात आलाय. कॅन्सरसारखा भयंकर आजार गरम नारळाच्या (coconut water) पाण्याने बरा होऊ शकत असेल तर हा खूप मोठा उपाय आहे. पण, हा दावा केलाय त्यात तथ्य आहे का? (Fact check)
असं काय नारळाच्या गरम पाण्यात असतं, त्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात हे पाहणं गरजेचं आहे. मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
नारळाचं गरम पाणी तुम्हाला आयुष्यभर कॅन्सरपासून वाचवू शकतं. गरम नारळ कॅन्सरच्या पेशी नष्ट करतो. एक कपमध्ये 2 ते 3 नारळाचे पातळ तुकडे करा, गरम पाणी घाला, ते पाणी क्षारयुक्त होईल, हे पाणी दररोज प्या, ते कोणासाठीही चांगलं आहे.
हा दावा केल्याने आम्ही याची पोलखोल करण्यासाठी आम्ही एक्सपर्टची मदत घेतली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवून या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं.
कॅन्सरसारखा आजार हा भयंकर आहे. तो वाढत गेला तर मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. असे मेसेज पाहून विश्वास ठेवू नका. तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आमच्या पडताळणीत नारळाच्या गरम पाण्यामुळे कॅन्सर बरा होतो हा दावा असत्य ठरलाय.