पत्नीचा परपुरूषासोबत पाहिला आक्षेपार्ह व्हिडिओ, पतीने संतापत उचलल टोकाचं पाऊल

पत्नीचाचं आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या फोनवर आला, संतापत पतीने जे केलं त्याने संपुर्ण राज्य हादरलं 

Updated: Oct 10, 2022, 06:45 PM IST
पत्नीचा परपुरूषासोबत पाहिला आक्षेपार्ह व्हिडिओ, पतीने संतापत उचलल टोकाचं पाऊल title=

जामताडा : देशभरात एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेअरच्या (Extra Marital Affair) घटना वाढल्या आहेत. या वाढत्या अफेअरच्या घटनांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये ही वाढ झाली आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलय. नेमकं या घटनेत काय झालंय ते जाणून घेऊयात.  

जमुआ गावातील राजेश रजक नामक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. काही दिवसांपुर्वी त्याच्या फोनवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ (Offensive video) आला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचा पाराच चढला आणि त्याने त्याच्या पत्नीला (wife) बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 

पत्नीचं जीवन का संपवलं ?
खर तर या घटनेत राजेश रजकच्या पत्नीचं गावातल्याच एका परपुरुषासोबत (Extra Marital Affair) अफेअर होते. या अफेअरची राजेशला कल्पना नव्हती. या दरम्यान राजेशची पत्नी आणि तो पुरुष एकत्र भेटायचे. एके दिवशी असेच भेटले असताना त्यांनी मर्यादा ओलांडल्या होत्या. या दरम्यानचा दोघांचा आक्षेपार्ह अवस्थेतला (Offensive video) एक व्हिडिओ गावतल्याच एका व्यक्तीनं रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. हा व्हि़डिओ (Offensive video) राजेश रजकला दाखण्यात आला  होता. 

आक्षेपार्ह व्हिडिओत काय होतं?
व्हिडिओत (Offensive video)  आपल्याच पत्नीला परपुरूषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून राजेश रजकला धक्काच बसला. पत्नीचा हा व्हिडिओ पाहून राजेश रजक संतापला आणि त्याने संतापाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी होत बेशुद्ध झाली. या अवस्थेत तिला जामतारा येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

याप्रकरणी मृत महिलेच्या भाऊ विकास राजकने कर्मतांड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर कर्मतांड पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी मारेकरी पती (Husband Arrested) राजेश रजक याला अटक करून कारागृहात रवानगी केली.

दरम्यान झारखंडच्या जामाताडामध्ये ही घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.