Anand Mahindra Tweet Video : उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर (Social Media) कायमच सक्रीय असतात. या माध्यमातून आनंद महिंद्रा अनेक प्रश्नांना वाचा फोडताना दिसतात. तर काही प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करून लोकांचं कौतूक करत असतात. आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून नेटकऱ्यांना निसर्ग सौंदर्य पाहण्याची अनुभूती दिली आहे. त्याचं ट्विट सध्या जोरदार व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. (Anand Mahindra told the secret of overcoming crises)
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर (Anand Mahindra Tweet Video) एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये एका पक्षी संकटात अडकलेला दिसतोय. समोर अन्नाच्या शोधात जात असताना पक्षाला वाऱ्याच्या वेगामुळे उडता येत नाही. त्यावेळी पक्षी आपली डोकं स्थिर ठेऊन वाऱ्याचा सामना करताना दिसतोय. त्यावर आधारित एक प्रेरणादायी वाक्य (The secret of overcoming crisis) आनंद महिंद्रा यांनी शेअर केलंय.
आपल्या स्वतःच्या जीवनासाठी धडे देण्यात निसर्ग कधीही कमी पडत नाही. अशांत काळाला तुम्ही कसे तोंड देता? तुमचा व्यवसाय कोणताही असो, वारा तुम्हाला झोंबेल तसे तुमचे पंख फडफडू द्या, पण तुमचं डोकं स्थिर ठेवा, तुमचं मन स्वच्छ आणि तुमचं डोळे सावध रहा, असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या (Anand Mahindra Tweet) माध्यमातून दिला आहे.
Nature never fails to provide lessons for our own lives. How do you face turbulent times? No matter what your profession is, let your wings flap as the winds buffet you, but keep your head stable, your mind clear & your eyes watchful. #MondayMotivaton pic.twitter.com/YDVm1uJXx5
— anand mahindra (@anandmahindra) October 10, 2022
दरम्यान, सोशल मीडिया नेटकऱ्यांनी या क्लिपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. हे धैर्य आणि दृढनिश्चयाचे एक आदर्श उदाहरण असल्याचं काही नेटिझन्स म्हणालंय. लाखों नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ (Social Media Viral Video) पाहिला असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.
आणखी वाचा - 'T20 World Cup जिंकायचा असेल तर...', Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य!