Telangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज

Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 30, 2023, 07:14 PM IST
Telangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज title=

Telangana Exit Poll : एक्झीट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार तेलंगणात सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसतंय. तर भाजपाला केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसंतय. सत्तेत असलेल्या बीआरएसलाही इथें मोठा  धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 2290 उमेदवार निवडणुसीच्या रिंगणात आहेत. आज या जागांसाठी मतदान पार पडलं. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत तेलंगणात बीआरएसची सत्ता होती. पण यावेळी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत रंगताना दिसत आहे. काही एक्झिटपोलच्यामते काँग्रेसला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आलं आहे. 

सीएनएक्स
भाजप – 2-4, काँग्रेस – 63-79, बीआरएस - 31-47,  इतर 03-05

पोलस्टार्ट
भाजप – 5-10, काँग्रेस – 49-59, बीआरएस - 48-58,  इतर 06-08

चाणक्य 
भाजप – 6-9, काँग्रेस – 67-78, बीआरएस - 22-31,  इतर 06-07

टाइम्स नाऊ
भाजप – 7, काँग्रेस – 37, बीआरएस - 66,  इतर 9

सीएनएन
भाजप – 10, काँग्रेस – 56, बीआरएस - 48,  इतर 5

रिपब्लिंक-जन की बात
भाजप – 7-13, काँग्रेस – 48-64, बीआरएस - 40-55,  इतर  4-7

तेलंगणा विधानसभेचा इतिहास
2014 मध्ये तेलंगणा शहराची निर्मिती झाली. तेव्हापासून तेंलगणा विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकीत तेलंगणाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. दोन्ही वेळी बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2023 विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव विजयाची हॅटट्रीक करणार असं वाटत असतानाच तेलंगणात काँग्रेसने मोठी झेप घेतली आहे. येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून यात चित्र स्पष्ट होईल. 

काँग्रेसने ताकद लावली
तेलंगणा विधानसभेच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली होती. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी इथं विशेष लक्ष दिलं. तर कर्नाटक काँग्रेसचं अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ तेलंगणात तळ ठोकून होते. 

दरम्यान भाजपाला तेलंगणात यावेळीह मोठं यश मिळवता येणार नाही असं दिसतंय. एक्झिट पोलनुसार भाजपाल एकेरी जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

तेलंगणा सद्यस्थिती काय होती पाहूया
तेलगु राष्ट्र समिती बीआरएस - 104
एमआयएम -  7
काँग्रेस - 5
भाजप - 3
तेदेप - 3
माकप - 1