नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करता आणि तुमचंही ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट आहे? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि कामाची आहे.
भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'ईपीएफओ'ने नुकतेच चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय जाणून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
ईपीएफओने केलेल्या बदलांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. पाहूयात काय आहेत हे चार निर्णय...
ईपीएफओ (EPFO)ने घेतलेल्या निर्णयानुसार पीएफचे दोन अकाऊंट असणार आहेत. एक कॅश अकाऊंट तर दुसरं ईटीएफ अकाऊंट असणार आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटची ८५ टक्के रक्कम कॅश अकाऊंटमध्ये असणार आहे. तर, ईटीएफ खात्यात १५ टक्के रक्कम जमा होईल.
ईटीएफ अकाऊंटमधील रक्कम ईपीएफओ शेअर बाजारात गुतवणूक करेल. यामुळे शेअर बाजारात शेअर बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये युनिटप्रमाणे दाखवण्यात येईल. निवृत्तीनंतर ज्यावेळी तुमच्या पीएफ खात्यातील पैसे काढताना तुमच्या युनिटची नेट किंमत असेल ती तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच तुमच्या युनिटची नेट किंमत किती आहे हे दररोज चेक करता येणार आहे. तुमच्या ईटीएफ अकाऊंटमध्ये युनिट १ एप्रिलपासून क्रेडिट होणार आहे.
आता तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये पैसे काढण्यासाठी अर्ज करता त्यावेळी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे उशीरा येतात. मात्र, आता ईपीएफओने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे पैसे देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) प्लॅटफॉर्मवर सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टम सुरु करेल. यामुळे डिपार्टमेंटकडून पैसे देण्यास ज्या दिवशी मंजुरी मिळेल त्याच दिवशी तुम्हाला पैसे मिळतील.
ईपीएफओकडून सुरु करण्यात आलेल्या तिसऱ्या सुविधेत तुमचं UAN तुम्ही स्वत: जनरेट करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक करावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही UAN जनरेट करु शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जावं लागणार आहे. त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती अपडेट करावी लागणार आहे.
ईपीएफओकडून आणखीन एक सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला एखादं करेक्शन करायचं असेल तर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवरुन ऑनलाईन रिक्वेस्ट करु शकता. यानुसार तुमचं नाव किंवा जन्म तारीख चुकीची असेल तर ते तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही विनंती करु शकता.