EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Updated: Dec 29, 2021, 08:12 PM IST
EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती title=

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांना काही सुचना केल्या आहेत आणि सदस्यांना त्या सुचनांचे पालन करण्यासाठी देखील सांगितले आहे. जर सदस्यांनी त्या सुचनांचे पालन केले नाही, तर त्यांचे खुप मोठे नुकसान होऊ शकते. EPFO ने सूचित केले आहे की, त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आजच ई-नॉमिनेशन (E-Nomination) दाखल करावे. EPF/EPS नॉमिनेशन तुम्ही डिजिटल पद्धतीने देखील करु शकता. यासाठी सदस्याला काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील.

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे की सदस्य ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यात नॉमिनीचे नाव कसे जोडू किंवा बदलू शकतात.

सर्वप्रथम, तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल.

त्यानंतर 'Service'  वर जा आणि 'For Employees' टॅबवर क्लिक करा

Services मध्ये 'Member UAN/Online Service (OCS/OTCP)' मध्ये तपासा

तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा

'Manage' टॅब अंतर्गत 'E-Nomination' निवडा

कुटुंब डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी 'Yes'  वर क्लिक करा

'Add Family Details' वर क्लिक करा

एकूण रक्कम डिकलेर करण्यासाठी 'Nomination Details' वर क्लिक करा

डिकलेरेशन नंतर 'Save EPF Nomination' वर क्लिक करा.

OTP मिळविण्यासाठी 'E-sign' वर क्लिक करा

तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

OTP टाका

यासह, EPFO वर तुमची E-nomination नोंदणी पूर्ण झाली आहे आणि तुम्ही

ई-नामांकनानंतर, तुम्हाला कोणतेही भौतिक दस्तऐवज सबमिट करण्याची आवश्यकता नाही आणि या चरणांची पूर्तता केल्यानंतर, तुम्ही घरबसल्या तुमच्या EPF खात्यात नॉमिनेशन व्यक्तीचे नाव सहजपणे प्रविष्ट करू शकाल.