तुमचे PF खाते आहे? तर मग जरूर वाचाच

तुमचे जर PF खाते असेल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना( Employees Provident Fund Organization) समभागधारकांना  एक्चेंज ट्रेडेड फंडातील (ईटीएफ) गुंतवणूकीचा हिस्सा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत टाकण्याबाबत विचार करत आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी इपीएफओ कार्यालय महालेखापरिक्षकांचा (कॅग) सल्ला घेत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 28, 2017, 09:05 PM IST
तुमचे PF खाते आहे? तर मग जरूर वाचाच title=

नवी दिल्ली : तुमचे जर PF खाते असेल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना( Employees Provident Fund Organization) समभागधारकांना  एक्चेंज ट्रेडेड फंडातील (ईटीएफ) गुंतवणूकीचा हिस्सा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत टाकण्याबाबत विचार करत आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी इपीएफओ कार्यालय महालेखापरिक्षकांचा (कॅग) सल्ला घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत इटीएफमध्ये इपीएफओची गुंतवणूक ४५,००० कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केंद्रीय भविष्य निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी याबाबत माहिती दिली. जॉय म्हणाले, कॅग याबाबत लवकरच आपला निर्णय देईल. कॅगने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर इपीएफओ हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सेंट्रल बोर्डाकडे (सीबीटी) पाठवेल. सीबीटीची बैठकही पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती व्ही. पी. जॉय यांनी दिली.

आतापर्यंत तरी आम्ही इटीएफकडून कोणत्याही प्रकारचे रिटर्न्स घेतले नाहीत. तसेच, सदस्यांनाही दिले नाहीत. आम्ही एक प्रणाली बनवली असून, त्याबाबत कॅगसोबत आमची बोलणी सुरू आहेत. ही बोलणी पूर्ण होताच ही प्रणाली सीबीटीसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येईल. याबाबत या आधीही विचार करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हा निर्णय होऊ शकला नव्हता अशी माहितीही जॉय यांनी या वेळी दिली.