EPFO e-Nomination process : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees' Provident Fund Organisation) आता ईपीएफ सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) अनिवार्य केलंय. असं केल्याने, खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खातेदाराने ज्याला नॉमिनी केलं आहे त्याच्या त्या पैशांवर अधिकार असतो. जर तुम्ही नॉमिनी केलं नाही तर ईपीएफ खातेधारकाला ईपीएफओच्या काही सुविधांपासून वंचित राहावं लागेल.
1. पीएफ खातेधारक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पीएफचा लाभ देण्यासाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) खूप उपयुक्त आहे. कोणत्याही पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, निवृत्तीवेतन, विमा आणि भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा निपटारा आणि ई-नॉमिनेशन आधीच केलं असेल तर ऑनलाइन दावा करणं शक्य आहे. EPFO मध्ये ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
2. पीएफ खातेदार फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच नॉमिनी करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब नसेल, तर तो इतर कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो. जर कुटुंबाबाहेरील व्यक्तीला नॉमिनी केलं गेलं आणि नंतर कुटुंबाला कळलं तरच कुटुंबातील सदस्यांनाच लाभ मिळतो. नातेवाईक नसलेल्यांचं नॉमिनेशन रद्द केलं जाईल. जर पीएफ खातेदाराने नॉमिनीचा उल्लेख न करता मृत्यू झाला तर उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावं लागतं.
3. पीएफ खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील करू शकतात. जर तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी घोषित करत असाल तर तुम्हाला सर्व डिटेल्स द्यावे लागतात. त्याचबरोबर कोणत्या नॉमिनीला किती रक्कम द्यायची हे नमूद करावं लागेल. म्हणजे नंतर वाद होणार नाहीत.
4. जर पीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन केलं नाही तर तो त्याचं पासबुक आणि शिल्लक रक्कम पाहू शकत नाही. ई-नॉमिनेशनासाठी UAN अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. याशिवाय, मोबाईल नंबरसुद्धा आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
. ई-नामांकनाची ऑनलाइन प्रक्रिया :
सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करा.
'सेवा' टॅबमधील ड्रॉप-डाउन मेनूमधून 'कर्मचाऱ्यांसाठी' टॅबवर क्लिक करा.
UAN ने लॉगिन करा. तुम्हाला मॅनेज टॅब दिसेल. यामध्ये तुम्हाला ई-नॉमिनेशन पर्याय निवडा.
आता तुमचा कायमचा पत्ता आणि सध्याच्या पत्त्याची नोंद करा.
कुटुंब घोषणा बदलण्यासाठी होय पर्याय निवडा.
नॉमिनीचे तपशील भरा आणि save वर क्लिक करा.
त्यानंतर ई-साइन आयकॉनवर क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक भरा आणि नोंदणीकृत (Registered) मोबाइल क्रमांकावर OTP येईल, तिथे टाईप करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचं ई-नॉमिनेशन अपडेट केलं जाईल.