बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला

Updated: Jun 28, 2019, 09:07 AM IST
बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू  title=

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरच्या बडगाममध्ये शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलानं चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय. बडगामच्या करालपोरामध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या एका एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलाला हे यश मिळालंय. सुरक्षा दलाला या भागात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दलानं शोध अभियान सुरू केलं.

दरम्यान, दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला. 

सुरक्षा दलानं एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. अद्याप सुरक्षा दलानं संपूर्ण भागाला वेढा घातलेला आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध अद्याप सुरू आहे.