सोपोरमध्ये २ ते ३ दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं, चकमक सुरू

सोपोर भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू 

Updated: Feb 22, 2019, 08:50 AM IST
सोपोरमध्ये २ ते ३ दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं, चकमक सुरू title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. २ ते ३ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलंय. आर्मी आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई आहे. सोपोरजवळ वारपोरा गावात दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार केला जात आहे. २२ राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ, एसओजी या मोहिमेत सहभागी आहेत. रात्री अडीच वाजल्यापासून हा गोळीबार सुरू आहे. 

राजस्‍थान रायफल, सीआरपीएफ, जम्‍मू काश्‍मीर पोलीस आणि एसओजी हे जॉइंट ऑपरेशन करत आहेतत. हा भाग खाली करण्यासाठी जवान प्रयत्न करत आहे. या भागात धारा १४४ लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.