कोरोना संकटात कामगारांना पीएफचा आधार

आर्थिक गरज असल्यास पीएफची रक्कम काढू शकणार

Updated: Apr 1, 2020, 06:48 PM IST
कोरोना संकटात कामगारांना पीएफचा आधार title=

 नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या मोठ्या संकटात कामगारांना आर्थिक गरज पडली तर त्यांच्या प्रॉविडंट फंड अर्थात भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. पीएफ किंवा पीपीएफ खात्यातून अशी रक्कम काढता येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून तसा संदेशही कामगार, कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

किती रक्कम काढता येईल?

कोरोनाच्या संकटात कामगार त्यांच्या पीएफ खात्यातून किती रक्कम काढू शकतात याबाबतची माहितीही भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून देण्यात आली आहे. कामगाराचं तीन महिन्याचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा कामगाराच्या खात्यावर जमा असलेली ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम यापैकी जी रक्कम कमी आहे, तेवढी रक्कम ते काढू शकतात. 

पीएफमधील रक्कम काढण्यासाठी कामगारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.