मंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती, विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)

Updated: Nov 19, 2022, 04:37 PM IST
मंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती,  विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral  title=

मुंबई : तुम्ही अनेकदा लोकांना मंदिरात पूजा करताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी हत्तीला देवासमोर डोकं टेकवताना पाहिलं आहे का? या हत्तीचा व्हिडिओ पाहून अनेकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. (Animals) या गजराजाने (Elephant) आपल्या स्टाईलने अनेकांची मने जिंकली.  (Viral Video) 

हत्ती हा सगळ्यात समजूतदार आणि संवेदनशील प्राणी आहे. तसेच, प्राण्यांना समजून घेणे खूप कठीण आहे. पण जर आपण त्याच्या कृती कडे नीट लक्ष दिलं तर तो जे काही करतो ते पाहून आपल्याला सगळं समजू लागतं. हा व्हिडीओ नक्कीच पाहा,  या फुटेजमध्ये दिसणार्‍या हत्तीनं आपल्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. 

या व्हिडिओमध्ये गजराज मंदिराच्या आत उभे असल्याचे दिसत आहे. आरतीच्या वेळी हत्तीनं आपलं डोके देवा (God) समोर नतमस्तक केले आहे जणू त्यालाही आपली भक्ती दाखवायची आहे. या भक्ताला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आणि प्रतिक्रिया देण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत. हत्ती आपली सोंड वर करून देवाचा आशीर्वाद घेताना दिसतो. या हत्तीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 20 सेकंदांचा हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला आहे. एवढंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक हत्तीची स्तुती करताना दिसत आहेत.