Mobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव

 Mobile Phone Explodes in Kerala: गेम खेळताना मोबाइलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून मुलगी पाचवीत शिकत होती.   

शिवराज यादव | Updated: Apr 25, 2023, 05:25 PM IST
Mobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव title=

 Mobile Phone Explodes in Kerala: लहान मुलांच्या हट्टासमोर अनेकदा पालक हतबल होतात. यामुळेच अनेक वेळा इच्छा नसतानाही पालक त्यांना शांत करण्यासाठी हातात मोबाइल देतात. पण हा मोबाइल नंतर व्यसन कधी होतो हे कळतंच नाही. हातात असणारा हा छोटासा मोबाइल किती धोकादायक ठरु शकतो याची पालकांसह मुलांनाही कल्पना नसते. केरळमध्ये नुकतंच मोबाइलमुळे एका आठ वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. गेम खेळत असताना मोबाइलचा स्फोट झाल्याने मुलीचा मृत्यू झाला. केरळच्या थिस्सूर येथे ही घटना घडली आहे. 

अदित्यश्री असं या चिमुरडीचं नाव असून ती तिसरीत शिकत होती. सोमवारी रात्री ही घटना घडली असून डॉक्टर अथक प्रयत्न करुनही तिला वाचवू शकले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी मोबाइल चार्जिंगला लावला असतानाच गेम खेळत होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे.

तीन वर्षांपूर्वी हा फोन विकत घेण्यात आला होता. तसंच एक वर्षापूर्वी तिची बॅटरी बदलण्यात आली होती. मोबाइलचा स्फोट झाला तेव्हा मुलगी आपल्या आजीसोबत होती. स्फोट झाल्यानंतर मुलीच्या हाताला आणि चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. 

मोबाइल फोनचा स्फोट होण्यापासून टाळण्यासाठी खालील गोष्टी नक्की करा - 

- चार्जिंगला लावलेला असताना मोबाइलचा वापर टाळा. खासकरुन जास्त बॅटरी वापरणाऱ्या गोष्टी म्हणजे गेमिंगसारखे प्रकार टाळा. 
- शरिराला नुकसान होणार नाही अशा अंतरावर मोबाइल फोन ठेवल्याची काळजी घ्या
- बाहेरच्या तापमानात मोबाइल फोन कमीत कमी बाहेर काढला जाईल यासाठी प्रयत्न कराा
- बॅटरी व्यवस्थित आहे की नाही हे सुनिश्चित करा
- फोन ब्रँडने दिलेलेच चार्जर आणि युएसबी केबल वापरा.