गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Updated: Jun 15, 2020, 03:57 PM IST
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. गुजरातच्या राजकोट भागात भूकंपाचे तिव्र झटके जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ एवढी नोंदवण्यात आली आहे. जवळपास १ वाजता या भूकंपाचे झटके गुजरातला बसले आहेत. दरम्यान रविवारी रात्री देखील गुजरातमधील काही भागांना भूकंपाचे झटके बसले होते. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल  एवढी नोंदवण्यात आली आहे.

सांगायचं झालं तर भूकंपाचे झटके ऐवढे तीव्र होते की नागरिकांनी आपल्या घरांमधून बाहेर पळ काढला. सतत येणाऱ्या भूकंपाच्या झटक्यांनी तेथील रहिवाशांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातच्या अहमदाबाद, गांधी नगर, राजकोट इत्यादी भागांना भूकंपाचा झटका बसला आहे. 

भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर व उत्तर पश्चिम राजकोटअसल्याची माहिती समोर आली होती. भूकंपाच्या झटक्यांनंतर नागरिकांनी घरबाहेर धाव घेतली. नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सांगण्यात येत आहे की भूकंपाची तीव्रता अधिक असल्यामुळे लोकांच्या घरातील सामान देखील पडले.  या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये.