पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-03 चे मिशन अयशस्वी, प्रक्षेपणानंतर काय झाले ते जाणून घ्या

भारताने आज पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस - 03 (EOS-03) अवकाशात सोडला पण हे मिशन यशस्वी झाले नाही.  

Updated: Aug 12, 2021, 07:09 AM IST
पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-03 चे मिशन अयशस्वी, प्रक्षेपणानंतर काय झाले ते जाणून घ्या title=
EOS-03 उपग्रहाची नैसर्गिक आपत्ती निरीक्षण करण्यास मदत (फोटो स्रोत- इस्रो)

मुंबई :  ISRO : भारताने आज पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस - 03 (EOS-03) अवकाशात सोडला पण हे मिशन यशस्वी झाले नाही. उड्डाण यशस्वी झाले पण उपग्रह योग्य कक्षेत पोहोचला नाही. त्यामुळे हे प्रक्षेपण अयशस्वी झाल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. (Mission failed: ISRO fails to put GISAT-1 EOS-03 satellite into orbit )

भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (इस्रो) गुरुवारी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट 'EOS-03' चे यशस्वी प्रक्षेपण केले, परंतु प्रक्षेपणानंतर तांत्रिक समस्या निर्माण झाली. माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष के शिवन म्हणाले की, क्रायोजेनिक अवस्थेत तांत्रिक बिघाडामुळे GSLV-F10/EOS-03 मोहीम पूर्ण होऊ शकली नाही.

लॉन्च झाल्यानंतर काय झाले?

इस्रोने सकाळी 5.43 वाजता EOS-03 चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि सर्व टप्पे त्यांच्या नियोजित वेळेनुसार होत गेले. परंतु शेवटच्या टप्प्यात ईओएस -3 अलग होण्यापूर्वी क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर इस्रोला संबंधित माहिती मिळवणे बंद झाले. तपासानंतर मिशन कंट्रोल सेंटरमध्ये बसलेल्या इस्रोचे प्रमुख डॉ. के. शिवन यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर, त्यांनी जाहीर केले की ईओएस -3 मिशन अंशतः अपयशी ठरले आहे.

EOS-03 Mission could not be fully accomplished

नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार होती

पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच्या (EOS-03) यशस्वी प्रक्षेपणानंतर, नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार होती. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या अंतराने ओळखलेल्या क्षेत्राच्या रिअल-टाइम प्रतिमा सातत्याने काही अंतराने पाठवण्यास मदत होणार होती. या व्यतिरिक्त, हे नैसर्गिक आपत्तींवर तसेच कोणत्याही अल्पकालीन घटनांवर त्वरित देखरेख ठेवण्यास मदत होणार होती. हा उपग्रह शेती, वनीकरण, पाणवठे तसेच आपत्तीचा इशारा, चक्रीवादळाबाबत माहिती, ढगफुटी किंवा वादळी पावसासह विविध भागांमधील क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याबाबतची महत्वाची माहिती पुरवण्याचे काम हा उपग्रह करणार होता.