मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. काही मजेदार व्हिडिओ असतात तर काहींमध्ये विचित्र घटना पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लोक मज्जा करण्यासाठी कोणत्याही थराला जातात, ते दाखवण्यात आलं आहे. पण ही मज्जा कधी जीव पणाला लावावा लागते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये एक मुलगी दारूच्या नशेत होती आणि तिनं बाल्कनीतून उडी मारली.
खरं तर, हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत असताना एका नेटकऱ्यानं 'ओह माय गॉड' लिहिले आणि नंतर शेअर केले. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही, मात्र हा व्हिडीओ पाहता हे भयावह दृष्य खूपच भितीदायक असल्याचे दिसून येत आहे. कारण खुद्द मुलीनेही तिच्या जीवाची पर्वा केलेली नाही. (Trending Video)
व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती मुलगी बाल्कनीत उभी होती. ती मुलगी दारूच्या नशेत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. बरेच लोक तिला रस्त्याच्या कडेला खाली चीअर करत आहेत आणि हे पाहून ती उडी मारण्याचा विचार करत असल्याचे दिसते. यासाठी तिनं बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूला उभी राहिली. त्यानंतर तिनं उडी मारली. उडी मारल्यानंतर ती मुलगी थेट खाली जाऊन पडली. (Drunk girl jumped from balcony action caught on camera video viral)
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
OMG!pic.twitter.com/OTdgNr00wO
— You Fecking Idiot (@YoufeckingIdiot) October 27, 2022
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाल्कनीत उभ्या असलेल्या कोणीतरी ते मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. मुलगी तिथून पडताच काही लोकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तिला पकडता न आल्याने ती जोरात खाली पडताना दिसत आहे. तिला दुखापत देखील झाली असावी असे दिसते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.