...आणि त्याने पोलिसालाही गाडीसोबत फरफटत नेलं, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

कारचालक उठला पोलिसाच्या जीवावर,  पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ  

Updated: Aug 15, 2021, 09:00 PM IST
...आणि त्याने पोलिसालाही गाडीसोबत फरफटत नेलं, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ title=

पटियाला: पोलिसाला कारसोबत फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ फार भयंकर आहे. कोणताही विचार न करता कार चालकानं थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. पोलिसाने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला फरफटत कारने नेलं आहे. या संपूर्ण घटनेचा धक्कादायक व्हि़डीओ समोर आला आहे. 

पंजाबमधील पटियाला भागातून अतिशय भीतीदायक व्हिडीओ समोर आला. येथे एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलीस कर्मचारी पांढऱ्या रंगाची कार थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण गाडी थांबत नाही. पोलीस कर्मचारी येतो आणि कारसमोर उभा राहतो, जेणेकरून गाडी पुढे जाऊ नये या उद्देशानं. पण चालक गाडी थांबवत नाही. तो गाडीचा वेग आणखी वाढवतो. जीव वाचवण्याचा पोलीस कर्मचारी प्रयत्न करतो. मात्र त्याला कार फरफटत घेऊन जाते. 

पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. मात्र त्याला दुखापत झाली आहे. तर कार चालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. पटियाला पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. तर जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.