DOT Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दीड लाखांच्यावर पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
दूरसंचार विभागाने TES ग्रुप ही अंतर्गत उपविभागीय अभियंता (SDE) पदांसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. दूरसंचार विभागाच्या या भरतीतून एकूण 48 पदे भरली जाणार आहेत. यामाध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद अशा विविध शहरांचा समावेश आहे.अहमदाबादमध्ये 3 पदे, नवी दिल्लीत 22 पदे, एर्नाकुलम येथे 1 पद, गंगटोकमध्ये 1, गुवाहाटीमध्ये 1 पद,जम्मूत 2 पदे, कोलकातामध्ये 4 पदे,मेरठमध्ये 2 पदे,मुंबईमध्ये 4 पदे, नागपूर- 2 पदे, शिलाँग 3 पदे, शिमलामध्ये 2 पदे, सिकंदराबादमध्ये 1 पद अशी एकूण 48 पदे भरली जातील.
दूरसंचार विभागातील भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.
दूरसंचार विभाग भर्ती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 56 वर्षे असावी.
दूरसंचार विभागातील या पदांसाठी जो उमेदवार निवडला जाईल, त्याला 47 हजार 600 रुपये ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
अर्जांचे पुनरावलोकन केल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखती किंवा इतर मूल्यांकनांसाठी बोलावले जाऊ शकते. सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे ही निवड केली जाणार आहे.
26 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतरच अर्ज करावा. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिेलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या.
सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट www.celindia.co.in वर याची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकारच्या डिपार्टेंट ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या अंतर्गत येते. या विभागाला वेगवेगळ्या ग्रेड्ससाठी ज्युनिअर असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन्सची गरज आहे. याचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आलाय.या पदांवर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमन यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. इतर इतरांसाठी 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूवर्क वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.