तरुण राहण्याचा 'गाढव' फॉम्युला

आंध्र प्रदेशमधली जनता गाढवांच्या (Donkey) जिवावर उठली आहे. आणि त्यामुळे आंध्रातली गाढवांची संख्या कमालीची घटली आहे.  

Updated: Feb 27, 2021, 08:23 PM IST
तरुण राहण्याचा 'गाढव' फॉम्युला  title=

हैद्राबाद : आंध्र प्रदेशमधली जनता गाढवांच्या (Donkey) जिवावर उठली आहे. आणि त्यामुळे आंध्रातली गाढवांची संख्या कमालीची घटली आहे. काय आहे यामागचं नेमकं कारण, हे सविस्तर सांगणारा आमचा हा विशेष वृत्तांत. (Donkey slaughter rises in AP as people believe meat can cure breathing problems)

एक निरूपद्रवी प्राणी अशी गाढवाची ओळख. ओझी वाहण्यासाठी गाढवाचा हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. मानवी समाजात पूर्णपणे मिसळून गेलेल्या गाढवाला आता माणसाकडूनच धोका निर्माण झाला आहे. कारण माणसं गाढवाची हत्या करू लागली आहेत.

गाढवाचं मांस खाल्ल्यानं लैंगिक ताकद वाढते असा आंध्र प्रदेशातील नागरिकांचा समज आहे. यातूनच आंध्रातल्या प्रकाशम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात गाढवांची हत्या करून त्यांचं मांस खाल्लं जात आहे. या भागांत दर गुरूवार, रविवारी गाढवाचं मांस विकलं जातं. त्यासाठी दिवसाला कमीत कमी शंभर गाढवांची हत्या केली जाते. (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power)

सुमारे सहाशे रूपये किलो दरानं त्यांचं मांस विकलं जातं. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व जातीधर्माची लोकं आणि सुशिक्षित नागरिकांकडून गाढवाचं मांस खरेदी केलं जातं. त्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून गाढवांची आंध्र प्रदेशात आयात केली जात आहे. गाढवाचं मांस खाल्ल्यामुळे पाठीचं दुखणं, दमा बरा होतो या मान्यतेतूनही आंध्रात गाढवाचं मांस खाल्लं जातंय. मात्र लैंगिक ताकद वाढण्यासाठी गाढवाचं मांस खरेदी करण्याचं प्रमाण आंध्रमध्ये जास्त आहे. 

गंभीर बाब म्हणजे 2019 या वर्षी आंध प्रदेशमध्ये गाढवांची संख्या अवघी 5 हजार इतकीच होती. गाढवांची हत्या अशीच सुरू राहिली तर लवकरच गाढवं नामशेष होतील यात शंका नाही. हा धोका ओळखून आंध्र प्रदेश सरकार आता हालचाली करत आहे. तर महाराष्ट्र सरकारनंही गाढवांच्या संरक्षणाचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत.