जागतिक मंदीचा फटका बसल्याने डॉमिनोज पिझ्झा बंद होणार?

बाजारपेठ नसलेल्या आणखी काही देशांमध्येही कंपनीची आऊटलेस बंद करण्याचा विचार डॉमिनोझकडून सुरु आहे.

Updated: Oct 18, 2019, 05:26 PM IST
जागतिक मंदीचा फटका बसल्याने डॉमिनोज पिझ्झा बंद होणार? title=

मुंबई: देशभरात मोठ्याप्रमाणावर पिझ्झा आऊटलेटस असलेल्या डॉमिनोझ कंपनीला जागतिक मंदीचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत कंपनीने अनेक देशांतून आपला गाशा गुंडाळला आहे. परिस्थिती आणखी बिकट झाल्यास डॉमिनोझ पिझ्झा भारतामधूनही काढता पाय घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिझ्झा हा खाद्यप्रकार भारतामध्ये रुजवण्यात आणि सामान्यांना परवडेल, अशा किंमतीत तो उपलब्ध करून देण्यात डॉमिनोझचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या बातमीने भारतातील खवय्यांची चिंता वाढली आहे. 

आता एटीएममधून मिळणार पिझ्झा

ब्रिटनस्थित डॉमिनोझला गेल्या काही दिवसांपासून जागतिक मंदीमुळे आर्थिक पातळीवर समस्यांचा सामना करावा लागत आहे. मंदीमुळे डॉमिनोझला मोठा तोटाही सहन करावा लागतोय. त्यामुळेच कंपनीने स्वीडन, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नॉर्वे या चार देशांमधून आपला गाशा गुंडाळला आहे. तसेच बाजारपेठ नसलेल्या आणखी काही देशांमध्येही कंपनीची आऊटलेस बंद करण्याचा विचार डॉमिनोझकडून सुरु आहे. 

नवरात्रात डॉमिनोजकडून उपवासाचा पिझ्झा

डॉमिनोझचे सीईओ डेव्हिड वाईल्ड यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले होते की, आम्हाला तोटा होत आहे आणि आम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यात कमी पडलो, अशा ठिकाणांहून आम्ही गाशा गुंडाळणार आहोत. मात्र, तुर्तास भारतामधील जनतेला याची चिंता करण्याची गरज नाही, असे डेव्हिड वाईल्ड यांनी सांगितले.