मुंबई: सध्या सर्वत्र सायबर क्राईमचे प्रकार फार वाढले आहे. त्यात डेटा लीक होण्याचा प्रकार देखील जास्त आहे. जगभरात 300 कोटीहून अधिक लोकांचे अकाउंटचे आईडी-पासवर्ड लीक झाले आहेत. Gmail सोबतचं Netflix आणि Linkedin चेही लॉगिन आईडी आणि पासवर्ड लीक झाले आहेत.
'The Sun' च्या अहवालानुसार जवळजवळ 1500 कोटी अकाउंटचा या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग आहे. यामध्ये 11.7 कोटीहून अधिक Linkedin आणि Netflix अकाउंटचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, वापरकर्त्यांचा हा डेटा इंटरनेटवर अपलोड करण्यात आला आहे. आपले इतर अकाउंट हॅक करण्यासाठी, हॅकर्स हा डेटा वापरू शकतात. तुम्हाला जर तुमचा अकाउंट HACK होण्यापासून वाचवायचा असेल. तर https://cybernews.com/personal-data-leak-check/ या लिंकवर क्लिक करा. या साइटवर तुम्ही तुमचा EMAIL ID लीक झाला आहे, किंवा नाही हे तपासू शकता.