अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड

या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 27, 2017, 10:23 AM IST
अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड   title=
Image: Twitter

नवी दिल्ली : या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

मध्यप्रदेशातील रिवामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. रिवामधील संजय गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी एका युवकाच्या पोटातून नाणी, खिळे आणि चेन काढले आहेत.

५ किलो वजनाच्या वस्तू गिळल्या

शुक्रवारी डॉक्टरांच्या एका टीमने ३२ वर्षीय तरुणाच्या पोटातून २६३ नाणी, १० ते १२ शेव्हिंग ब्लेड, काचेचे तुकडे, लोखंडी साखळीशिवायही अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत.

धातूच्या वस्तू खाण्याची सवय

या तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुलाला धातूच्या वस्तू खाण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो धातूसदृश्य वस्तू खात असे. लहानपणापासूनच तो लपून-छपून नाणी आणि इतर लोखंडी वस्तू खात असे.

पोटदुखीचा त्रास

सतना जिल्ह्यातील सोहावल येथे राहणाऱ्या मकसूद या तरुणाला शनिवारी (१८ नोव्हेंबर) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याची तपासणी सुरु करण्यात आली आणि शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आलं.

गेल्या सहा महिन्यांपासून या तरुणावर उपचार सुरु होते. सतनामध्ये सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी त्याला टीबी झाल्याचं म्हणत उपचार सुरु होता. मात्र, परिस्थितीत सुधार होत नसल्याने रिवा मेडिकल कॉलेजमध्ये त्याला आणण्यात आलं. यानंतर तपासणीत हा प्रकार समोर आल्याची माहिती रुग्णाच्या नातवाईकांनी दिली आहे.