इंडिगो प्लेनमध्ये मच्छरवरुन डॉक्टरांशी वाद

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये लखनऊ येथून बंगळूरुला जाणाऱ्या विमानातून प्रवास करताना हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सौरभ राय यांनी फ्लाईटमध्ये मच्छर असल्याची तक्रार केली तेव्हा त्यांना धक्के मारुन खाली उतरण्यात आले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर डॉक्टरांशी गैरवर्तणूकही करण्यात आली. तसेच त्यांना माफीनामाही लिहिण्यास सांगण्यात आला.

Updated: Apr 10, 2018, 11:08 AM IST
इंडिगो प्लेनमध्ये मच्छरवरुन डॉक्टरांशी वाद title=

नवी दिल्ली : इंडिगोच्या फ्लाईटमध्ये लखनऊ येथून बंगळूरुला जाणाऱ्या विमानातून प्रवास करताना हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सौरभ राय यांनी फ्लाईटमध्ये मच्छर असल्याची तक्रार केली तेव्हा त्यांना धक्के मारुन खाली उतरण्यात आले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर डॉक्टरांशी गैरवर्तणूकही करण्यात आली. तसेच त्यांना माफीनामाही लिहिण्यास सांगण्यात आला.

सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा इंडिगोने विधान करताना म्हटले, जोपर्यंत समस्या सोडवली जात होती त्याआधीच डॉक्टर आक्रमक झाले. दरम्यान, एअरपोर्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांकडून अद्याप याबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

मच्छरांनी त्रस्त झाले प्रवासी

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी इंडिगोची फ्लाईट 6E-541 लखनऊ येथून बंगळूरुला जात होती. यावेळी हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सौरभ रायही या विमानातून प्रवास करत होते. ते ज्या सीटवर बसले होते त्याच्या मागच्या सीटवर बसलेल्या अनेक मुलांना मच्छरांनी हैराण करण्यास सुरवात केली. अनेक प्रवाशांनी क्रू मेंबर्सना याची माहिती दिली पण त्यांनी पाहून न पाहिल्यासारखे केले.

तक्रार करणे पडले भारी

डॉ. सौरभ राय  यांच्या मते जेव्हा अनेकदा तक्रार करुनही मच्छरांबाबत कोणतीच अॅक्शन घेतली जात नव्हती तेव्हा ते क्रू मेंबर्सना म्हणाले,  विमानात खूप मच्छर असल्याने सगळ्याच प्रवाशांना त्रास होतोय. येथे लहान मुलांपासून वृद्ध माणसेही आहेत. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दरम्यान डॉक्टरांना ही तक्रार करणे महागात पडले आणि त्यांना विमानातून उतरवण्यात आले. 

एअर होस्टेसचे धक्कादायक विधान

विमानातील एअर होस्टेसनी आपल्यासोबत गैरवर्तणक केल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय. मच्छर कुठे नाहीयेत. संपूर्ण देशात मच्छर आहेत. तर देश सोडून जा असे एका एअर होस्टेसने आपल्याला सांगितल्याचे डॉक्टर म्हणाले. यावेळी डॉक्टरांनी मच्छरांसाठी स्प्रे करण्यास सुचवले तर त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांचे सामानही बाहेर फेकण्यात आले.